मेष : दिवस मनाप्रमाणे घालवावा. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.
वृषभ : कौटुंबिक सौख्याचा विचार कराल. व्यावसायिक अडचण मिटवाल. चांगल्या कामाची योजना आखाल. सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन : आर्थिक व्यवहार पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती राहील. घरातील ज्येष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. अनावश्यक खर्च टाळावा. आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल.
कर्क : बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. जिभेवर ताबा ठेवा. परिवारातील प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कामाची दिवसभर धांदल राहील.
सिंह : पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. शक्यतो हलका आहार घ्यावा. दिवसाचा उत्तरार्ध मौजमजेत घालवाल. घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. धन आणि प्रतिष्ठेची हानी असे कृत्य करू नका. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा.
कन्या : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. संयम ढळू देऊ नका. कौटुंबिक समस्येतून मार्ग निघेल. घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल.
तुळ : जोडीदाराचा खोटेपणा नाराजी वाढवू शकतो. आकांततांडव करू नका. स्पर्धेत यश मिळवाल. ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. जोडीदाराची काळजी घ्या.
वृश्चिक : काही प्रश्न गोडीने सोडवावेत. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. बोलण्यावर ताबा ठेवावा. आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे.
धनु : रेस, जुगार यातून नफा कमवाल. वादाच्या मुद्यातून मार्ग काढाल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल.
मकर : लहानांशी मतभेदाची शक्यता. घराबाहेर वावरतांना सावध रहा. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका.
कुंभ : योग्य संधीचा लाभ घ्यावा लागेल. उगाच बंधनात अडकू नका. वैचारिक धोरण बदलून पहावे. गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.
मीन : व्यवसाय वाढीचा आनंद घ्याल. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. मित्रांशी भेट होईल. दिवस आनंदात व्यतीत कराल.