मेष : चांगल्या कामात गुंतवणूक केल्याने मन प्रसन्न राहील. शेजाऱ्यांशी सुरू असलेली भांडणेही दूर होतील. काम करताना डोक्यावर फार ताण घेऊ नका. खूप दिवसांपासून राहिलेले वाचन पूर्ण कराल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. कामातून समाधान मिळवाल. अनावश्यक तर्क-वितर्क करू नयेत.
वृषभ : प्रभावशाली लोकांशी संपर्क आणि सामाजिक सक्रियता वाढवा. सावधगिरी बाळगा, तुम्ही महत्त्वाचे दस्तऐवज गमावू शकता किंवा विसरु शकता ज्यामुळे त्रास होईल. मुलांकडून आनंद मिळेल. जुनी येणी वसूल होतील. आपला दिवस चांगला जाईल. मनातील चुकीच्या विचारांना थारा देऊ नका. मित्रांविषयी मनात ग्रह करून घेऊ नका.
मिथुन : संकटात धीर धरा. काही वेळा तुमच्या संशयी स्वभावामुळे कामातही त्रास होऊ शकतो. मुलांची कोणतीही समस्या सोडवताना त्यांना नक्कीच मदत करा. घरातील कामात व्यस्त राहाल. कामात जोडीदाराची मदत होईल. कामात काही स्वाभाविक बदल संभवतात. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी सोडू नका. कठीण कामात चिकाटी सोडू नका.
कर्क : घरात जवळच्या व्यक्तीच्या उपस्थितीमुळे आनंदी वातावरण निर्माण होईल. आर्थिक कारणांमुळे तुम्हाला तुमच्या काही योजना टाळाव्या लागतील. विद्यार्थ्यानी मेहनतीला कमी पडू नये. नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता. आवडीचे पदार्थ चाखाल. जवळच्या प्रवासात समानाची काळजी घ्या. नातेवाईकांची गाठ पडेल.
सिंह : तुमच्या वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला मौल्यवान भेट मिळू शकते. इतरांचे कधीही ऐकू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. स्वत:वर पूर्ण आत्मविश्वास ठेवा. दिवस चांगला जाईल. कौटुंबिक जबाबदारी उत्तम पार पाडाल. जुन्या मित्रांशी संपर्क साधला जाईल. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस.
कन्या : मुलांच्या कोणत्याही नकारात्मक कृतीबद्दल काळजी वाटणे स्वाभाविक आहे. पण शांतपणे परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न करा. तसेच घरातील मोठ्या व्यक्तीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वैचारिक भावना वाढीस लागेल. घरातील लोकांचे सल्ले उपयोगी येतील. अधिक श्रम उपसावे लागू शकतात. एखादे जबाबदारीचे काम अंगावर पडू शकते. जोडीदाराची गरज लक्षात घ्या.
तूळ : सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कमकुवतपणावर मात करण्याचा प्रयत्न करा. जास्त काम केल्याने राग आणि चिडचिड होऊ शकते. व्यवसायात अधिकार प्राप्त होतील. दिवसाची सुरुवात संमिश्र असेल. दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात. मात्र आपण त्यातून मार्ग काढू शकाल. नातेसंबंध दृढ होतील.
वृश्चिक : तुमच्या भविष्यातील ध्येयासाठी तुमचे प्रयत्न लवकरच यशस्वी होतील. सासरच्यांशी संबंधात दुरावा येणार नाही याची काळजी घ्या. अप्रिय बातम्यांची चिन्हे देखील आहेत ज्यामुळे भीती आणि नैराश्य येऊ शकते. नोकरीत मनासारखे काम मिळेल. कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये. प्रेमातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस. नवीन ओळख होईल. येणार्या काळात ओळखीचा फायदा होईल.
धनू : लक्षात ठेवा की थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला ध्येयापासून दूर जाऊ शकतो. यावेळी, अचानक खर्च सुरू झाल्यामुळे तुम्ही नाराज व्हाल. आत्मविश्वासाने कामे कराल. मनात संशयाला थारा देऊ नका. तुमचे मार्गदर्शन इतरांना लाभदायक ठरेल. सासरच्या मंडळींकडून लाभाची शक्यता. मित्रांच्या मदतीने काही लाभ संभवतात.
मकर : घाई करण्याऐवजी शांतपणे आणि सकारात्मक वागण्याचा प्रयत्न करा. नक्कीच यश मिळेल. कोणत्याही प्रकारची अनिश्चितता असल्यास, काम टाळणे चांगले होईल. गुंतवणुकी संदर्भात तज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रलोभनाला भुलून जाऊ नका. दिवसाची सुरुवात उर्जेने होईल. व्यापारी वर्गाला उत्तम दिवस. चर्चेतून मतभेद संपुष्टात येतील.
कुंभ : तरुणांना त्यांच्या करिअरबाबत अधिक जागरुकता येईल आणि यश मिळू शकेल. संवाद साधताना शब्दांचा योग्य वापर करा. तुमच्यावर बदनामी किंवा खोटे बोलण्याचा आरोप लावला जाऊ शकतो. काही खर्च अचानक येतील. अति तिखट पदार्थ टाळावेत. आरामाची इच्छा प्रबळ होईल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. अनुभवी व्यक्तींच्या भेटीचा योग.
मीन : अडकलेले किंवा उधार घेतलेले पैसेही परत मिळू शकतात. लक्षात ठेवा की अगदी कमी नकारात्मक लोकांना देखील तुमच्या यशाचा हेवा वाटू शकतो. या गोष्टींकडे लक्ष न देता स्वतःला कामात झोकून द्या. स्पर्धेत यश मिळवाल. जोडीदाराचा सल्ला घ्यावा. अचानक धनलाभाची शक्यता. महत्त्वाच्या गोष्टी गुप्त ठेवा. ध्यानधारणेतून मानसिक तणाव कमी होईल.