जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुका बिनचूक पार पाडण्यासाठी मतदान पथकातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना ग्रामविकास अँपच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार असून संबंधितांनी bit.ly/GramVikas हे
अॅप डाउनलोड करावे असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
जळगाव जिल्हा निवडणूक कार्यालयाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मतदान पथकात नियुक्त करावयाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी ग्रामविकास विभागामार्फत ग्राम विकास अॅप विकसीत केले आहे. सदर अॅपवर निवडणूक विषयक प्रशिक्षणाशी संबंधीत सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर अॅप डाऊनलोड करण्यासाठी bit.ly/GramVikas ही लिंक दिलेली आहे. निवडणुकीत मतदान पथकातील सर्व अधिकारी,कर्मचारी यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, आपण या लिंकवर क्लिक करून गूगल प्ले स्टोअर मधून “ग्रामविकास अॅप डाउनलोड करावे व सदर अॅपवर उपलब्ध करुन दिलेले निवडणूक विषयक प्रशिक्षण साहित्य डाऊनलोड करुन घ्यावे.
निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांना अॅपच्या नोंदणीसाठी https://bit.ly/RegistrationHelp Video या लिंक मध्ये नमूद व्हिडिओ मध्ये कार्यवाहीचे सर्व टप्पे नमूद करण्यात आले आहे, त्याचे अवलोकन करुन कार्यवाही करावी. या संदर्भातील शुक्रवार, दि. 22 ऑक्टोबर, 2024 पर्यंत आपली नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.
आपल्याला नोंदणीमध्ये कोणतीही समस्या असल्यास https://bit.ly/WhatsappHelpGroup या व्हॉट्सअॅप समूहात पुढील नमूद लिंकवर क्लीक करुन सामील व्हावे असे सांगण्यात आले आहे.