TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आनंदवार्ता : धरणगाव तहसीलदारांची मालेगावला बदली !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2023
in जिल्हा प्रशासन, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील वादग्रस्त तहसीलदार नितीन देवरे यांची अखेर बदली झाली आहे. तलाठ्यांचे काम बंद आंदोलन, पत्रकाराला नोटीस, पाळधी गौण खनिज प्रकरण, पिंपळे शिवारातील ७० हेक्टर सुपीक जमीनीवर स्टोन क्रेशर परवानगी अशा अनेक विषयात ते वादग्रस्त ठरलेले होते. तहसीलदार नितीन देवरे यांची मालेगाव ता. जि. नाशिक येथे बदली झाल्याचे आदेश सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. दुसरीकडे तहसीलदार यांची बदली झाल्याचे वृत्त आनंददायी असल्याची प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र महाजन यांनी दिली आहे.

सदरील आदेशात संबंधित अधिकारी यांना बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करीत असलेल्या पदावरुन देशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यांनी त्यांच्या पदस्थापनेच्या पदावर दि. १३ मार्च २०२३ जी (म.पू.) रुजू होणे अनिवार्य आहे. सदर आदेशाद्वारे रुपेशकुमार सुराणा, श्री. चंद्रजित राजपूत, कैलास चावडे (पाचोरा) (सर्व तहसिलदार) यांना त्यांच्या सद्याच्या पदावरुन एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असून त्यांच्या स्थापनेबाबतचे आदेश यथावकाश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील, असे म्हटले आहे. सोशल मीडियातील आदेशावर शासनाचे सह सचिव डॉ. माधव वीर यांची स्वाक्षरी असल्याचे दिसत आहे.

READ ALSO

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

धरणगावचे तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या कामाबद्दल काही तलाठी यांनी नाराजी व्यक्त करत २०२१ मध्ये  कामबंद आंदोलन केले होते. हा वाद अनेक दिवस रंगला असल्याचे माध्यमात छापून आले होते. दुसरीकडे गेल्यावर्षी पाळधी बुद्रुक, ता. धरणगाव येथील अवैधरीत्या उचल केलेल्या १९ हजार ब्रास मुरुमासंदर्भात १८ कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. याप्रकरणी संबंधित कंपनीने न्यायालयात दाद मागितली आणि फेरचौकशीची मागणी केली. न्यायालयाने दिलासा दिल्यावर धरणगाव तहसीलदारांनी तक्रारदाराविना पंचनामा केल्याने नवा वाद उभा राहिला होता. आर्थिक फायद्यासाठीच जिल्हा प्रशासनाने सोयीने एकतर्फी फेरचौकशी सुरू केल्याचा आरोप तक्रारदार दीपककुमार गुप्ता यांनी केला होता.

एका स्टोन क्रेशरच्या व्यवसायासाठी पिंपळे शिवारातील ७० हेक्टर सुपीक जमीन नापीक होऊ देऊ नका, अशी आर्तहाकच शेतकऱ्यांनी दिली होती. संबंधित व्यवसायिकाने नियमांची पायमल्ली केली असून धरणगाव तहसीलदारांनी याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलेय. कारण त्यांनी संबंधिताकडून चिरीमिरी घेतली असल्याचा गंभीर आरोप देखील शेतकऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कुटुंबासह सामुहिक आत्महत्येची परवानगी देण्याची मागणी करत केल्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती.

तर कॉंग्रेसचे कार्यकर्ते रामचंद्र माळी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार करत तहसीलदार देवरे हे वारंवार माळी समाजातील लोकांना टार्गेट करत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर देवरे यांची पुढील काही दिवसात बदली होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती.

तहसीलदार बदली झाल्याचे वृत्त आनंददायी असल्याची प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र महाजन यांनी दिली आहे. दरम्यान, आगामी येवू घातलेल्या निवडणुका निर्भय, नि:पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी जितेंद्र महाजन यांनी याआधीच निवडणूक आयोगाकडे मे २०२२ मध्ये केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १० मार्च २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : विवेक ठाकरेची प्रकृती बिघडली ; येरवडा कारागृह रुग्णालयात उपचार सुरु !

January 15, 2021

फडणवीस सरकारने दिशाभूल केली : अशोक चव्हाण

March 10, 2021

जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला 20 वर्ष कारावासाची शिक्षा !

October 12, 2022

मोबाईलसह दुचाकी लांबवली ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

October 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group