जळगाव (प्रतिनिधी) आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मेहरूण येथील श्रीराम माध्यमिक विद्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील, नगरसेवक प्रशांत नाईक, संस्था सचिव अशोक लाडवंजारी यांचे शुभहस्ते शाळेच्या प्रांगणात पिंपळाचे, कडुलिंब, गुलमोहर असे २५ वृक्षरोपण करण्यात आले.
यावेळी विलास भदाणे, सलीम इनामदार, अनिल सोनवणे, शबाना बी सादिक खाटीक (नगरसेविका), मुख्याध्यापक दिवाकर जोशी, सलमान खाटीक, नईम खाटीक, दिनेश पाटील, अमित तडवी, संतोष चाटे, शाळेतील शिक्षीका सौ. संगिता कुलकर्णी, सौ. संनो पिंजारी, प्रतिभा पाटील, सौ. राजश्री तायडे, संजय बडगुजर आदी उपस्थित होते. यावेळी भैय्यासाहेब रवींद्र पाटील व श्री प्रशांत नाईक यांच्या व विद्यालयाच्यावतीने शाल व श्रीफळ देवुन सत्कारही करण्यात आला.