बीड (वृत्तसंस्था) बीडच्या (Beed) गेेवराई तालुक्यातील रामपुरी गावात (village), ६ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी तलवाडा पोलिसांत (police) बाललैंगिक अत्याचार तसेच अन्य कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी सुंदर निवृत्ती तायड (वय- ३४) आणि विनोद गणपत शरणांगत (वय- २२) दोघे रा. रामपुरी ता. गेवराई जि. बीड या दोघांच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत.
५ मे दिवशी या दोघांंनी रात्री १२ वाजता पीडित ६ वर्षीय चिमुकीला उचलून नेवून, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. ही बाब पिडीतेच्या आईला लक्षात आल्यानंतर, त्यांनी तलवाडा पोलिसांत धाव घेतली घेत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी एक आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पिडीतेला न्यायालयात हजर केल्यानंतर, दोन व्यक्ती होते. असा जबाब पिडीतेने दिल्यानंतर दुसरा आरोपीचे नाव या गुन्हात समाविष्ट करण्यात आले होते. दरम्यान याप्रकरणी पुण्यातील हडपसर येथून मुख्य आरोपीला व त्याच्या साथीदाराला रामपुरी गावातून अटक करण्यात आली आहे.