पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील पूनगाव येथील दोन तरुणांकडून गावठी कट्टा जप्त केले आहेत. राहुल अनिल परदेशी (27, पूनगाव, ता.पाचोरा) व रामचंद्र गोपीचंद परदेशी (34, पूनगाव, ता.पाचोरा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. ही कारवाई बुधवारी रात्री 11.30 वाजता करण्यात आली.
पूनगावातील दोघा संशयितांकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा निरीक्षक राहुल खताळ यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुरेश पाटील, पोलीस हवालदार विश्वास देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल संदीप भोई, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश शिवदे आदींच्या पथकाने महादेव मंदिराजवळील पोल्ट्री फार्मजवळ संशयीत येताच त्यांना अटक केली तसेच गावठी कट्टा जप्त केला. प्रकाश शिवदे यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष अवघ्या एकदिवस आधीही अशाच पद्धतीची कारवाई केली होती.