धरणगाव (प्रतिनिधी) चिंचपूरा ते पिंपरी गावा दरम्यान पिंप्री शिवारात रोडवर मद्यधुंद आयशर चालकाने मोटासायकलला कट मारल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात मोटासायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात शेख इमरान शेख बिस्मिल्ला (वय २५, रा. रथ चौक बालाजी मंदिर, धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २४ मे २०२२ रोजी आयशर चालक त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून घाईघाईने चालवत होता. यातच आयशरच क्र. (MH०४ HD ८७०२) ने शेख इमरान यांची मोटारसायकल (क्र. MH १९ AQ२७८६) ला जोरदार कट मारला. त्यात शेख इमरान यांच्या डोक्यास डाव्या बाजूस व डाव्या गालावर पत्रा लागला. तसेच शेख इमरान यांच्या आईला उजव्या पायाला मार लागून जखमी झाले. यानंतर आयशर चालक फरार झाला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात शेख इमरान शेख बिस्मिल्ला यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मोटासायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ मंगला पवार हे करीत आहेत.