चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील घाटरोड परीसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत दोन चोरट्यांनी चाळीसगाव शहर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांनी चोरी केलेल्या दोन महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत. उमर फारुख कलीम अहमद वय-२०, मोहम्मद शोएब मोहम्मद ईलियास वय-२३, दोन्ही रा. मालेगाव जि.नाशिक असे अटक केलेल्या सराईन चोरट्यांचे नावे आहेत.
चाळीसगाव शहरातील घाटरोड परिसरात राहणारे व्यापारी मुबशीर खान मेहमुद खान वय-27 यांची महागडी दुचाकी क्रमांक MH-19 EC-0582 हि १३ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांना सीसीटीव्ही व गोपनिय माहितीनुसार संशयित आरोपीला अटक करण्याबाबत सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने उमर फारुख कलीम अहमद वय-20, मोहम्मद शोएब मोहम्मद ईलियास वय 23 दोन्ही रा. मालेगाव जि.नाशिक या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ३५ हजार रूपये किंमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आलेआहे. दुसरी दुचाकी ही ठाणे जिल्ह्यातून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ राहूल सोनवणे आणि ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर (पवार) आणि विभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक संदिप पाटील सुचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोहेकॉ राहुल सोनवणे, पोना भुषण पाटील, पोना महेंद्र पाटील, पोकॉ विजय पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रविंद्र बच्छे, पोकॉ पवन पाटील, पोकॉ राकेश महाजन, पोकॉ नरेद्र चौधरी यांचे पथकाने केली आहे.