जळगाव (प्रतिनिधी) पैशांच्या वादातून अकबर सत्तार कुरेशी (वय ४२, रा. हरिविठ्ठल नगर) याला दोघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना दि. १९ रोजी हरिविठ्ठल नगरात घडली. याप्रकरणी दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील हरिविठ्ठल नगरातील जूना बाजार पट्टा परिसरात अकबर कुरेशी हे वास्तव्यास आहे. पैशांच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरुन दि. १९ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास दोघ अज्ञात इसमांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली. दरम्यान, कुरेशी यांनी रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली असून त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.