जळगाव (प्रतिनिधी) बांभोरी येथील गिरणा पुलाजवळ आज दुपारी दोन कार समोरासमोर धडकल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून अनेक वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
आज दुपारी एमएच १९-सीव्ही-४८६१ तसेच एमएच १९- सीझेड २५८१ या क्रमांकाच्या दोन कारची गिरणा पुला जवळ समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. परंतू या अपघातात कुणी जखमी झालेय का?, याची माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, पुलाजवळ अपघात झाल्यामुळे दोन्ही बाजूंनी तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांचा त्रास सहन करावा लागत आहे. शहराकडून खोटे नगर स्टॉपपर्यंत तर दुसर्या बाजूने जैनकंपनीपर्यंत वाहनांची रांग दिसून येत आहेत.
















