धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भवरखेडा येथील एकाच्या घरासमोरून दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील भवरखेडा येथील रहिवासी अविनाश नाना पाटील(वय ३०) यांची दुचाकी (एम.एच.१९.डी.ए.९७४१) क्रमांकाची दि ७ रोजी रात्रीच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दि ९ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी त्यांनी तत्काळ धरणगाव पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.दीपक पाटील हे करीत आहेत.