जळगाव (प्रतिनिधी) शहरातील डी-मार्ट येथे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची दुचाकी पार्किंगमधून गायब झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख असलम शेख इस्माईल (रा. संतोषी माता मंदिराजवळ, मेहरूण) हे आपल्या परिवारासह ३० सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास डीमार्ट येथे खरेदीसाठी आला होता. खरेदी झाल्यानंतर घरी निघाला असता त्यांना जागेवर लावलेली दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएम ९०९६) आढळून आली नाही. आजू-बाजूला शोधा-शोध केली मात्र मिळाली नाही. शेख यांनी पुन्हा ४-५ दिवसांनी डी-मार्ट येथे तपास केला आणि संपुर्ण परिसर शोधून काढले. पंरतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. आज अखेर रामानंद नगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास चंद्रकांत पाटील करीत आहे.