धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील परिहार नगरमधून अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबवल्याची घटना नुकतीच घडली आहे.
या संदर्भात अधिक असे की, बापू रामदास महाजन (वय, ४५ वर्ष, व्यवसाय शेती) हे आपल्या परिवारासह परिहार नगरमध्ये वास्तव्यास आहेत. श्री. महाजन यांची स्पेल्डर प्लस मोटार सायकल (MH१९ BL६४८३) शहरातील परिहार नगर भागात लावलेली होती. अज्ञात चोरट्याने रात्री ७ ते ८ वाजेच्या दरम्यान ती चोरून नेली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. प्रमोद पाटील हे करीत आहेत.
















