जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरातून दुचाकी चोरी झाल्याची घटना १९ रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील प्लॉट न ०३ येथून हिरो कंपनीची स्पेल्डर प्लस काळ्या रंगाची ३० हजार किंमतीची (RJ.०५.LS ६९२२) या नंबरची केशवकुमार भरतसिंग (वय २४) यांची मालकीची दुचाकी लांबविल्याची घटना दि १९ रोजी रात्री ११ वाजता घडली होती. याप्रकणी फिर्यादी केशवकुमार भरतसिंग यांनी दि २० रोजी सकाळी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेका प्रफुल्ल धांडे हे करीत आहेत.