हिंगोली (वृत्तसंस्था) वसमत तालुक्यातील वसमत-औंढा नागनाथ राज्य रस्त्यावरील वाई गोरक्षनाथ पाटीजवळ वाई येथील दोन युवकांचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.१४) रात्री ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
विनय विलास मोगले (२२) व प्रफुल तातेराव खंदारे (२०) दोघे रा. वाई गोरक्षनाथ हे काही कामानिमित्ताने चौंडी स्टेशनला गेले होते. तेथून गावी परत येत असताना वाई पाटीजळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कुरुंदा पोलीस ठाण्याचे फौजदार गवळी, बीट जमादार बालाजी जोगदंड, शंकर भिसे यांनीही घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या दोघांना वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी जखमींची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.