नांदेड (वृत्तसंस्था) भोकरहून लग्न सोहळ्याला हजेरी लावून नांदेडकडे परत जातांना नांदेड-बारड रस्त्यावरील खैरगाव पाटीजवळ ट्रक-दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सुमारास घडली. संदीप काळे (२२), राहुल कोलते (२८) अशी मृतांची नावे आहेत.
संदीप आणि राहुल अपघातात ठार झालेले हे दोघं तरुण नांदेडमधील चिखलवाडीचे रहिवासी आहेत. भोकरहून लग्न सोहळ्याला हजेरी लावून संदीप व राहुल हे दोघे दुचाकीवर (एमएच २५ बीझेड २०३६) नांदेडला येत होते. याचवेळी खैरगाव पाटीजवळ भोकर फाट्याकडून बारडकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (आरजे १४ जीपी ४७५७) दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर संतप्त झालेल्या वऱ्हाडी मंडळींनी अपघातस्थळी रास्ता रोको केला. त्यामुळे ठप्प झाली होती. थोड्यावेळानंतर वाहतूक महामार्ग पोलिसांनी हस्तक्षेप करुन सुरळीत केली.