धरणगाव (प्रतिनिधी) आज १८ फेब्रुवारी गुरुवारी रोजी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० पर्यंत धरणगाव शहरातील पाणी प्रश्नाबाबत नगरपालिकेतील सत्ताधारी नगरसेवक, नगराध्यक्ष, व प्रशासकीय अधिकारी वर्ग, आणि गेल्या २० ते २५ वर्षापासून निवडणुकीच्या वेळेस पाणी प्रश्न मार्गी लावु असे आश्वासन देऊन निघून जातात ते आपले पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री या सर्वाना त्यांच्या कर्तव्याची आठवण देण्यासाठी आम्ही अँड.संजय छगन महाजन व अँड.शरद रामदास माळी हे लाक्षणिक उपोषण करत आहेत.
तसेच वरील सर्वांना शहरातील १५ ते १६ दिवसाआड होणारा अशुद्ध पाणीपुरवठा व नागरिकांचे होणारे हाल लक्षात येतील. न. पा.तील सत्ताधारी सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी कोणत्याही प्रकारे प्रयत्न करतांना दिसून येत नाहीत. पूर्ण एकहाती सत्ता असतांना व पाणीपुरवठा मंत्री राहून देखील पाणीपुरवठाकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्स्यावर रस्ता बांधकामात अधिक रस सत्ताधारी घेत आहेत. आपण गावातील नागरिक म्हणून आपल्या मूलभूत गरजा मागणीचा संविधानिक अधिकार आपल्याला अधिकार आहे. त्यामुळे आम्ही दोघे लाक्षणिक उपोषणाला बसलो व शहरातील नागरिक, सामाजिक संघटना, वकील संघटना, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते सुभाष पाटील, जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, शिरीष बयस, पुनीलाल महाजन, शहराध्यक्ष दिलीप महाजन, मधुकर रोकडे, भाजपचे गटनेते कैलास माळी, नगरसेवक अँड. राजेंद्र येवले, ललित येवले, गुलाब मराठे, शरद कंखरे, कडू बयास, भालचंद्र माळी, तेली समाज महासभा जिल्हाध्यक्ष सुनिल चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष दिपक वाघमारे, अरविंद देवरे, राष्ट्रीय कॉग्रेसचे युवा नेते चंदन पाटील, गौरव चव्हाण, कान्हाशेठ भाटिया, व्यापारी आघाडीचे संजय कोठारी, शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रकाश पाटील, आर.पी.आय जिल्हाउपाध्यक्षा दिक्षा गायकवाड आदिंनी उपोषणास भेट देऊन जाहीर पाठींबा दिला. व सर्व पत्रकार बंधूनी भेट दिली.