जळगाव (प्रतिनिधी) अमित ठाकरे यांनी जळगाव जिल्हा दौऱ्यात शहरांमधील व जिल्ह्यामधील अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यामुळे अनेक महाविद्यालयीन तरुण प्रभावित झाले असून आज विद्यार्थी विषयाशी निगडित असलेले जयेश चौधरी यांच्या यांच्या नेतृत्वात शहरातील ३० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मनसेत प्रवेश केला. आगामी काळात संपूर्ण जिल्हाभरातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आणण्याचा संकल्प जयेश चौधरी यांनी प्रवेशाच्या प्रसंगी बोलून दाखवला.
यावेळी जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे शहराध्यक्ष किरण तळले शहर सचिव महेंद्र सपकाळे शहर उपाध्यक्ष चेतन पवार, दीपक राठोड, व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तेजस चौधरी, सुजित कोळी, सोनवणे, श्याम पाटील, हर्षित नन्नवरे, शुभम बाविस्कर, ध्रुव पाटील, चेतन पाटील, तेजस मावळे, हितेश शिंपी, गोपाळ चौधरी, तेजस राजपूत, पार्थ देशपांडे, पंकज राजपूत, लखीचंद मुंगड, मयूर पाटील, महेश पाटील, भूषण बाविस्कर, नाचिकेत सूर्यवंशी, राज शिंदे, रुपेश शिंपी, विवेक पाटील हर्षल कोळी गणेश वाणी, रोहित पाटील रोहित चौधरी मयूर कोळी आदींचा समावेश होता.
विद्यार्थी सेवा कक्षाची स्थापना !
जळगाव जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवण्याकरता करता विद्यार्थी सेवा कक्षाची दिनांक २४ जुलै रोजी होणार असून जिल्ह्याभरातील विद्यार्थ्यांचे प्रश्न एकाच ठिकाणी मांडण्याकरता सेवा कक्ष कार्यरत राहील व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी सर्व अंगीकृत संघटना विद्यार्थी सेनेच्या विषयावर पाठपुरावा करेल. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमिल देशपांडे यांनी दिली.