सांगली (वृत्तसंस्था) सर्पदंशाने बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १५) सावळज येथे घडली. प्रांजल प्रमोद माळी (वय ८) असे मृत मुलीचे नाव आहे.
मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास राहत्या घरात विषारी सापाने प्रांजलला दंश केला होता. रात्रीची वेळ असल्याने सर्पदंश झाल्याची तिला लवकर जाणीव झाली नाही. मात्र, काही वेळाने त्रास होऊ लागल्याने तिला उपचारासाठी सावळज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, प्रांजल अधिकच अत्यावस्थ असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी सांगलीला हलवण्यात आले. दरम्यान, उपचारापूर्वीच प्रांजलची प्राणज्योत मालवली. सावळज येथे इंग्लिश मिडियम स्कूलमधील इयत्ता तिसरीत शिकत होती.