नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपच्या बड्या नेत्या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त झाल्या आहेत. इराणी यांनी स्वतः ट्विट करुन आपण कोरोनामुक्त झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच सदिच्छा व्यक्त करणाऱ्या शुभचिंतकांचे त्यांनी आभार मानले आहेत.
28 ऑक्टोबर रोजी स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर नवी दिल्लीतील एका रूग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांच्या उपचारांनंतर अखेर आज त्यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ही आला आहे. यावेळी स्मृती इराणींनी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या शुभचिंतकांचे त्यांनी आभार मानलेत. स्मृती इराणी यापूर्वी बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये व्यस्त होत्या. याचदरम्यान त्या अनेकांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं म्हटलं जात होतं.
















