जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय एन मुक्टोच्या केंद्रीय अध्यक्षपदी प्रा.डॉ.अनिल पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.
आज केंद्रीय एन मुक्टोची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी डॉ.अनिल पाटील(रावेर), उपाध्यक्ष प्रा इ.जी नेहते (भुसावळ), प्रा डॉ मनोज गायकवाड (शहादा),सचिव प्रा जितेंद्र तलावारे (धुळे),सहसचिव -प्रा पी एस लोहार(चोपडा),खजिनदार-प्रा के जी कोल्हे (ऐनपूर),अंतर्गत हिशोब तपासणीस प्रा.पी.बी अहिरराव(दोंडाईचा), निवृत्त प्राध्यापक- प्रा संजय सोनवणे(साक्री), महिला प्रतिनिधी- डॉ रत्नमाला बेंद्रे (कबचौउमवी),बुलेटिन प्रतिनिधी प्रा.जे.एस पाटील(फैजपूर), स्वीकृत सदस्य-प्रा पी एस महाले(बोदवड), प्रा.प्रवीण बोरसे(धरणगाव), निवडणूक अधिकारी म्हणून प्रा.सुधीर पाटील यांनी काम पाहिले. तर या सभेचे अध्यक्षस्थानी डॉ.संजय सोनवणे होते. तर प्रास्तविक प्रा.बी.पी. सावखेडकर यांनी केले.