भवरखेडे ता. धरणगाव (प्रतिनिधी) विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम 2022 या निवडणुकीत “नम्रता पॅनलचे” सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच सलग सात पंचवार्षिक निवडणूकीत विजयी झालेले व प्रथमच चेअरमन पदाचे मानकरी कृष्णकांत प्रल्हाद पाटील, तर व्हाईस चेअरमनपदी सिंधुबाई माणिक पाटील यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे.
तसेच सदस्यपदी किशोर माणिक पाटील, जुलाल अभिमन पाटील, गोकुळ दोधू माळी, नवल बाबुराव पाटील, संतोष तुळशीराम पाटील, ज्ञानेश्वर भिला पाटील, भागाबाई जालम पाटील, सुंदरबाई रमेश पाटील, निळकंठ हरचंद माळी, रामदास गोंटु सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी मनोज डाबेराव, विकास सो,सचिव चंद्रसिंग परिहार, क्लर्क सतिष सुरेश पाटील यांनी कामकाज पहिले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी “नम्रता पॅनल “चे पॅनल प्रमुख तसेच ग्रामस्थ व सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
















