चोपडा (प्रतिनिधी) ग्रामसत्ता एकजूट एकमुठ संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी उर्वेश साळुंखे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सर्व पक्षीय युवा ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच तथा राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून ग्रामसत्ता एकजूट एकमुठ या नावाची संघटना स्थापन केली. त्याची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा जळगाव मध्ये संपन्न झाली यात 18 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांच्या नेमणुका झाल्यात.
यात चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील सामाजिक कार्यकर्ते उर्वेश साळुंखे यांची जळगाव जिल्हाउपाध्यक्ष पदी संघटनेचे राज्य अध्यक्ष तेजस पाटील यांनी नियुक्ती केली. उर्वेश साळुंखे मागील 3 वर्षापासून समाजकारणात राजकरणात सक्रिय आहे. उर्वेश साळुंखे यांच्या निवडीचे चोपडा तालुक्यातून कौतुक होत आहे.