जळगाव (प्रतिनिधी) वेश्या व्यवसायासाठी हॉटेलचा वापर करणा-या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर नारायण सोनवणे (लॉज मालक) व शाम विश्वास बोरसे, असे विनापरवाना लॉज व हॉटेल चालवणा-या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी छापेमारी केली तेव्हा सागर हॉटेल व लॉजिंगमध्ये पश्चिम बंगाल येथील विशीच्या वयोगटातील पाच तरुणी या हॉटेल वजा लॉजमधे आढळून आल्या. 3 डिसेंबरच्या सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सचिन सुरेश साळुंके (वय ३५ वर्ष, व्यवसाय नोकरी, नेम- उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे हे करीत आहेत.