नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ५० कोटी लसींचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करणारं ट्वीट केलं आहे. “कोरोनाविरोधातल्या भारताच्या लढ्याला एक प्रबळ प्रेरणा मिळाली आहे. आपल्या लसीकरण मोहिमेनं ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. मला आशा आहे की यात उत्तरोत्तर भर पडत जाईल आणि सर्वांना मोफत लसीकरण मोहिमेमध्ये आपल्या नागरिकांना लस दिली जाईल”, असं ट्वीट पंतप्रधानांनी केलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात मोठ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. तर दुसरीकडे सर्वांत केंद्र सरकारनं मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. तसंच ज्यांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची असेल त्यांना ती खासगी रुग्णालयातही घेता येईल. सर्व राज्यांना लस पुरवण्याचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे. तसंच डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वांचं लसीकरण करण्याचं ध्येय असल्याचं केंद्र सरकारनं नमूद केलं होतं. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ५० कोटी नागरिकांचं लसीकरण झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत, यासंदर्भातील माहिती दिली.
देशामध्ये लसीचा डोस घेणाऱ्यांची संख्या ५० कोटींवर गेली असून एकीकडे रूग्णवाढ होत असतानाच लसीकरणाचे दिलासादायक चित्रही समोर आलं आहे. यामध्ये पहिला डोस घेणारे ३९ कोटी तर दुसरा डोस पूर्ण करणाऱ्या ११ कोटी नागरिकांचा समावेश आहे. “भारताच्या कोरोनाविषय लढ्याला मोठी प्रेरणा मिळाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या संख्येनं ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. सर्वांना मोफत लस या मोहिमेखाली आपल्या नागरिकांना लस दिली जाईल आणि यात मोठ्या प्रमाणात भर पडेल अशी आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.