जळगाव (प्रतिनिधी) कोरोना संकटात ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी धडपडणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवारी लसीकरण शिबीर आयोजीत करण्यात आले होते. त्यात १०३ कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली.
कोरोना आपत्तीतही स्वतःचा जीव धोक्यात घालून, कोविड रुग्णालये व विलगीकरण कक्ष यांना सुरळीत व अखंडित वीज पुरविणे तसेच लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांना सेवा उपलब्ध करून देण्याचे काम महावितरणचे कर्मचारी अहोरात्र करीत आहेत. इतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांप्रमाणेच तेही कोविड योद्धा म्हणून कार्यरत आहेत. परंतु त्यांना लस मिळत नव्हती. तथापि, महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारूक शेख यांच्या पुढाकाराने व जिल्हा शल्यचिकित्सक नागोराव चव्हाण यांच्या सहकार्याने महावितरण कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी शुक्रवारी जळगाव परिमंडल परिसरातील लघु प्रशिक्षण केंद्र येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १०३ कर्मचाऱ्यांनी लस घेतली.
याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक नेमीलाल राठोड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, कार्यकारी अभियंता एन. बी. चौधरी, व्यवस्थापक उद्धव कडवे, व्ही. के. पाटील, प्रदीप पाटील, आर. आर. सावकारे, सिद्धार्थ लोखंडे, चेतन तायडे, विजय सोनवणे, आत्माराम लोंढे, ज्ञानेश्वर पाटील व विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनासाठी सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी, सहसचिव कुंदन भंगाळे, मंडल सचिव देवेंद्र भंगाळे यांनी परिश्रम घेतले. लसीकरणासाठी डॉ. सुहास बडगुजर, परिचारिका संगीता साबळे, प्रदीप पाटील, वानखेडे यांनी मोलाचे सहकार्य केले.