TheClearNews.Com
Wednesday, May 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग आता ‘एसएमएस’द्वारे पाठवता येणार

The Clear News Desk by The Clear News Desk
April 30, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणने मोबाईल अ‍ॅप व वेबसाईटद्वारे वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठवण्याची सोय उपलब्ध करून दिल्यानंतर आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारेही मीटर रीडिंग पाठवण्याची खास सोय उपलब्ध करून दिली आहे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात सध्या संचारबंदी सुरू आहे. तसेच अनेक भाग व सोसायट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. अशा ठिकाणी महावितरणला मीटर रीडिंग घेणे शक्य न झाल्यास किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात आल्यानंतरही वीजग्राहकांना महावितरण मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे स्वतःहून मीटर रीडिंग पाठवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सोय कायम ठेवून महावितरणने आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारेही ग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ज्या ग्राहकांकडे स्मार्टफोन नाही अशा ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठवता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना दरमहा चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

READ ALSO

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रीडिंगसाठी निश्चित केलेली तारीख ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांकही नमूद आहे. रीडिंगच्या या निश्चित तारखेच्या एक दिवसाआधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे दरमहा विनंती करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटद्वारे रीडिंग पाठविता येईल. सोबतच या चार दिवसांमध्ये आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारेही मीटर रीडिंग पाठवता येणार आहे.

‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठवण्यासाठी ग्राहकांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक हा ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेला असणे आवश्यक आहे. या नोंदणीकृत मोबाईलवर मीटर रीडिंग पाठवण्याबाबतचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर चार दिवसांपर्यंत ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठवणे आवश्यक आहे. वीजग्राहकांनी MREAD<स्पेस><१२ अंकी ग्राहक क्रमांक><स्पेस><KWH रीडिंग ८ अंकापर्यंत> असा ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठवायचा आहे. उदा. १२ अंकी ग्राहक क्रमांक १२३४५६७८९०१२ हा असल्यास व मीटरचे KWH रीडिंग ८९५० असे असल्यास MREAD १२३४५६७८९०१२ ८९५० या प्रकारचा ‘एसएमएस’ पाठवायचा आहे. चुकीचे व मुदतीनंतर पाठविलेले मीटर रीडिंग स्वीकारण्यात येणार नाही व ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठवण्याची सोय केवळ कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध राहणार आहे.

वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठवण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्वतःहून रीडिंग पाठवल्यास मीटरकडे व रीडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीजवापरावरही नियंत्रण राहील. रीडिंगनुसार वीजबिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तात्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. मीटर रीडिंग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येतील. शंका-समाधानासाठी तक्रार करता येईल. या व इतर विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी स्वतःहून दरमहा मीटर रीडिंग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
Next Post

युवानेते प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला आर्थिक मदत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात निर्बंध मुक्तीची ‘गुढी’ ; कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले, मास्क देखील ऐच्छिक !

March 31, 2022

बारा हजाराची लाच घेतल्याप्रकरणी खासगी पंटरसह दोन पोलिसांना अटक

September 25, 2025

त्या रेल्वेने आईचा मृतदेह कसा नेवू? ; रुग्णवाहिकेतून मृतदेह नेण्यासाठी मुलाची भावनिक विनवणी

January 24, 2025

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 2 ते 8 ऑक्टोबर 2022 !

October 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group