जळगाव (प्रतिनिधी) वटसावित्री पौर्णिमा निमित्त शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे यांचे हस्ते वडाचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका राजश्री महाजन यांनी किशोर वायकोळे यांचे स्वागत केले. या प्रसंगी किशोर वायकोळे यांनी वडाचे सध्याच्या कोरोना काळातील महत्व पटवून सांगितले. याप्रसंगी वड व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली. प्रसंगी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नेहा जंगले, धनंजय फिरके, ललित चौधरी, राहुल चौधरी, भागवत चोपडे, उल्हास भोळे, अरविंद सूरवळकर, सुनिल नेहेते, योजना चौधरी, प्रतिभा किनगे, हर्षा इंगळे, स्वाती जंगले, लक्ष्मी भालेराव आदी उपस्थित होते.