धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे अन्न पुरवठा मंत्री तसेच आखिल भारतीय ओबीसी राष्ट्रीय नेते छगन भुजबळ यांच्यासह विविध संघटनांनी बंगाल निवडणुकीत विजय मिळविल्याबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले होते. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी श्री. भुजबळ यांच्या बाबतीत धमकीयुक्त वक्तव्य केले. या वक्तव्याचा महात्मा फुले समता परिषद व विविध संघटनेद्वारे आज निषेध करण्यात आला.
यावेळी धरणगाव तहसिलदार यांना प्रातिनिधिक स्वरूपात निवेदन देण्यात आले व चद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांची माफी मागावी, नाहीतर भविष्यात त्यांचा विरूध्द मोठे आंदोलन केले जाईलं, अशी मागणी महात्मा फुले समता परिषद व विविध संघटनेद्वारे करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व महात्मा फुले समता परिषद तालुका अध्यक्ष धनराज माळी यांचा हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी माळी समाज कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी, संत . सा. मा. युवक संघांचे जिल्हा सल्लागार विनायक महाजन, शेतकरी आघाडी प्रमुख गजानन महाजन, महात्मा फुले ब्रिग्रेड जिल्हा युवक अध्यक्ष मनोज माळी, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख डॉ. डी.एस. देवरे, महात्मा फुले बिग्रेडचे तालुका अध्यक्ष नरेंद्र महाजन, सावता माळी युवक संघ शहर अध्यक्ष योगेश पाटील उपस्थित होते.