धरणगाव (प्रतिनिधी) येथील अखिल भारतीय बडगुजर समाज मंगल कार्यालयात धरणगाव शहर बडगुजर समाजाची सर्वसाधारण सभा झाली. यावेळी बडगुजर समाजाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी वासुदेव बडगुजर तर सचिवपदी अनिल बडगुजर यांची निवड करण्यात आली आहे.
अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष मनोहर बडगुजर होते. समाजबांधवांचे मंगल कार्यालय बांधकाम, पंचवार्षिक कार्यकारिणी निवड आदी विषयांवर चर्चा झाली. अध्यक्ष – वासुदेव तुकाराम बडगुजर, उपाध्यक्ष – घनश्याम बाबूलाल बडगुजर, सचिव – अनिल रमेश बडगुजर, सहसचिव – गणेश कोतवाल यांची तर सदस्यपदी सचिन बडगुजर, सुमित बडगुजर, ज्ञानदेव बडगुजर, बिंदीलाल बडगुजर, मिलिंद बडगुजर, जयेश बडगुजर, उमेश बडगुजर यांची एकमताने निवड करण्यात आली. वरील सर्व नवनियुक्त पदाधिकारी हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. बैठकीत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाजाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.