नाशिक (वृत्तसंस्था) येथील बिटको रूग्णालयात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्या दरम्यान देवेंद्र फडणीस यांना नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. एवढेच नव्हे तर यावेळी गिरीश महाजन व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.
बिटको रूग्णालयात पाहणी दौऱ्यावर आलेल्या देवेंद्र फडणीस यांना नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. बिटको रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त करत म्हंटले की, सोशल डिस्टन्स धडे नागरिकांना दाखवतात मात्र स्वतः पाळत नाहीत, तसंच नेत्यांना कार्यकर्त्यांसह रुग्णालयात प्रवेश मिळतो मात्र, सर्वसामान्यांना प्रवेश मिळत नाही. यावरून गिरीश महाजन व नातेवाईकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. याबाबत सकाळने व्हिडीओ वृत्तांत प्रकाशित केला आहे.