धरणगाव प्रतिनिधी । आज (दि. २२ सप्टेंबर २०२०) मंगळवार रोजी शहरातील पत्रकार बांधवांचा बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले असून ‘द क्लियर न्यूज़’ चे संपादक विजय वाघमारे यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला आहे.
यामध्ये ज्येष्ठ पत्रकार कडू रूपा महाजन ( तरुण भारत ), सतिष बोरसे (दैनिक सामना), योगेश पाटील (बुलंद पोलीस टाईम), मगनलाल बन्सी(EBM NEWS),कल्पेश महाजन (दिव्य मराठी) , हाजी साहेब (साईमत ) , रविभाऊ महाजन (सकाळ ) या सर्व पत्रकार बांधवांचा बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक आबासाहेब वाघ, बामसेफ तालुका अध्यक्ष पी. डी. पाटील, उपाध्यक्ष हेमंत माळी, किशोर पवार, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, इंदिरा गांधी विद्यालयाचे शिक्षक डी. एम. पाटील, एन. बी. पाटील, प्रोटॉन संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनिल देशमुख, आकाश बिवाल, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका अध्यक्ष निलेश पवार, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे नगर मोमीन, करीम लाला, रईस मोमीन, बहुजन क्रांती मोर्चाचे बबलू वाघमारे, ओंकार माळी, प्रकाश सपकाळे, महेंद्र तायडे, विकास पवार यांच्यासह बामसेफ व सहयोगी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.