चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ओझर शिवारातील गावठी दारू तयार करण्याच्या भट्टीवर चाळीसगाव शहर पोलिसांनी आज सकाळी छापा मारून गावठी दारूचे कच्चे, पक्के रसायन व तयार दारू असा एकूण एकुण ८४ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याचा जागेवर नाश करण्यात आला असून ४ जणांवर चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील ओझर शिवारात शेतात गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर आज पोलीस निरीक्षक श विजयकुमार ठाकूरवाड, सपोनि सचिन कापडने, उपनिरीक्षक महावीर जाधव, हवालदार गणेश पाटील, अभिमान पाटील, पंढरीनाथ पवार, प्रविण संगेले, विनोद भोई, विनोद खैरनार, भूषण पाटील, प्रकाश पाटील, सतिष राजपूत, भगवान माळी यांनी सकाळी ७ वाजेच्या सुमारास छापा टाकला. त्यांच्याकडून २०० लिटर उकळते रसायण, २६२५ लिटर कच्चे रसायन, ७७० लिटर गावठी दारू असा एकुण ८४ ते १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागेवर नाश करण्यात आला. याप्रकरणी ४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.














