भुसावळ (प्रतिनिधी) तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शिवपूर कन्हाळा शिवारातील नाल्याजवळ सार्वजनिक जागी गावठी हातभट्टी नष्ट करत पोलीसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. यावेळी ३५ लिटर दारु म्हणजेच ७१,१५० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जुम्मा छट्टू गवळी (रा.कन्हाळा) असे आरोपीचे नाव असून हा गावठी हटभट्टीची दारू गाळण्याची भट्टी रचुन पेट्ट्त्या चुलीवर हाथ भट्टीची दारू गांळतानां गूळ मोह नवसागर मिश्रित द्रव्य कच्चे रसायन ११ ड्रम त्यात २१०० लिटर रसायण व गावठी हटभट्टीची ३५ लिटर तयार दारू असे ड्रमसह अंदाजे किंमत ७१,१५० रु. चे मालासह मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध प्रोव्ही कायदा अन्वये कलम ६५ फ, ब, क, ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सपोनि अमोल पवार स फौ सुनील चौधरी, पोहेकाँ विठ्ठल फुसे, युनूस इब्राहिम शेख, प्रवीण पाटील, होम कम्लेंस, सपकाळे युनूस शेख, पोलीस पाटील रेवसिंग पाटील यांनी केली आहे