चोपडा (प्रतिनिधी) सातपुडा जंगलात गावठी पिस्तुलांची तस्करी करताना चार जणांना पकडण्यात आले. यावेळी आरोपींची पोलिसांशी झटापटही झाली.
हरजनसिंग प्रकाशसिंग चावला ( २०), मनमितसिंग धृवासिंग बर्नाला (२०, रा. पारउमर्टी ता. वरला, जिल्हा बडवाणी), अलबास दाऊद पिंजारी (२७, रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव) आणि अर्जुन तिलकराज मलिक (२५, रा. अमृतसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या चारही जणांना कृष्णापूर ते उमर्टी या दरम्यान सातपुडा डोंगराळ भागात पकडण्यात आले. त्यावेळी चारही जणांनी पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतू अखेर पोलिसांना त्यांना अटक केली. त्यांच्याकडून ९ गावठी पिस्तुले व २० जिवंत काडतुसांसह चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. रविवारी दुपारी १२:४५ वाजेच्या सुमारास कृष्णापूर गावाजवळ ही कारवाई करण्यात आली. चोपडा ग्रामीण पोलिसांत चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.