कोरपावली (प्रतिनिधी) येथील उर्दू शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले मारुळ येथील मूळ रहिवासी जावेद बाबू तडवी यांचा ग्राप कोरपावली आणि तडवी पंच कमिटी यांनी मिळून सत्कार केला.
जावेद बाबू तडवी यांनी गावातील लहानपणी वडिलांचे निधन झालेल्या व आईही कायम आजारी राहत असलेल्या जुमा लतीफ तडवी याचा स्वखर्चाने मोहरद येथील इब्राहीम सुभान तडवी यांची कन्या रुकसानाबी हिच्याशी दि.१३ मार्च २०२२ रोजी मोठ्या थाटात लग्न करून दिलं. तसेच मुलगी बघण्यापासून ते वर वधूचे दागिने, कपडे, जेवण, वर्हाडीसाठी गाड्या असा लग्नकार्यात लागणार सर्व खर्च त्यांनी केला. तसेच आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून एक आदर्श निर्माण करून दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेत ग्राप कोरपावली आणि तडवी पंच कमिटी यांनी मिळून त्यांचा नुकताच सत्कार केला.
सदर कार्यक्रमाला सरपंच विलास अडकमोल, माजी सरपंच जलील पटेल, देशदूतचे तालुका प्रतिनिधी अरुणदादा पाटील, समाजसेवक मुक्तार पटेल, मुनाफ तडवी, ग्राप सदस्य आयोजक सिकंदर तडवी, सत्तार तडवी, आरिफ तडवी, अफरोज पटेल मराठी शाळेचे मुख्याध्यापक धनराज कोळी, जाकीर शाह, निवृत्ती भिरुड, सह जावेद सरांचे सासरे मरदान तडवी, ग्राप कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवीसह गावातील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य यांच्या सहकार्याने स्वखर्चाने सोडविल्याबद्दल व गावातील पथदिवे, गटार सफाई अशा आरोग्यमय कार्य केल्याबद्दल उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल यांचे चिरंजीव समाजसेवक मुक्तार पटेल यांनी स्वखर्चाने अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, इतर शैक्षणिक कामानिमित्त लागणारे दाखले काढून दिल्याबद्दल मुख्यध्यापक धनराज कोळी, देशदूतचे तालुका प्रतिनिधी अरुण पाटील, जिल्हाध्यक्ष जलील पटेल, सरपंच विलास अडकमोल या सगळ्यांचे चांगले सामाजिक कार्य केल्याबद्दल गौरव आणि सत्कार करण्यात आला.