धरणगाव (प्रतिनिधी) आयुक्त तथा संचालक सौ नगरपरिषद प्रशासन संचलनालय, नवी मुंबई यांचा पत्रानुसार दीनदयाळ जण उपजीविकअंतर्गत धरणगाव शहर कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी धरणगाव येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे विनोद सुरेश रोकडे यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड प्रक्रिया रामनिवास झंवर (मुख्याधिकारी तथा प्रशासक धरणगाव नगरपालिका) यांनी समितीचा मिटींगमध्ये निवड पत्रक देऊन केली. यावेळी नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक भिकन पारधी, प्रकल्प अधिकारी तुषार सोनार, कर निरीक्षक जोगी, नगरपालिकाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.