मुंबई (वृत्तसंस्था) विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून १५ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. कोव्हिड सेंटर जळीत कांडामुळे पोलिसांनी रुग्णालयाच्या दोन व्यवस्थापक डॉक्टरांना अटक केली आहे.
विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत १५ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी नंतर रुग्णालयाच्या दोन व्यवस्थापक डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. डॉ. शैलेश पाठक आणि डॉ. दिलीप जैन यांना पोलिसांनी अटक केली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत