बोदवड (प्रतिनिधी) बोदवड (Bodwad) नगरपंचायतीतील उर्वरीत चार प्रभागांसाठी आज मतदान होत असुन २, ३, १५ व १७ या चार प्रभागासाठी निवडणूक होत आहे. यात पुरुष २ हजार ५९३ व महिला २ हजार ३५८ असे एकूण ४ हजार ९५१ मतदारांना मतदान करता येणार आहे. दरम्यान, प्रभाग १५, १७ मध्ये उमेदवार न देता शिवसेना, भाजप सोबत असल्याचे बोलले जात आहे.
बोदवड शहरातील ४ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात असून याकरीता प्रशासनाने ८ बूथची व्यवस्था केली आहे. एक बूथसाठी सहा कर्मचारी, केंद्र अध्यक्ष, एक मतदान अधिकारी, तीन शिपाई दोन असे पाच कर्मचारी असून प्रत्येक बूथवर ५ कर्मचारी २ पोलीस कर्मचारी पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचारी असे एकूण ८ पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. चार जागेवरील निवडणुकीसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहीणी खडसे– खेवलकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील व शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या चार प्रभागांमध्ये स्वतः आपल्या उमेदवाराचा प्रचार करत ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे.
दोन प्रभागात भाजप – शिवसेना युती
भाजपने या चार प्रभागांपैकी २ व ३ याच प्रभागात आपले दोन उमेदवार दिले असून प्रभाग १५, १७ मध्ये उमेदवार न देता शिवसेना, भाजप सोबत असल्याचे बोलले जात आहे. बोदवड नगरपंचायत १७ प्रभाग असुन नगरपंचायतवर सत्ता स्थापन कोण करणार हे जरी स्पष्ट होत नसले तरी या चार जागांवर सत्ता समिकरण असल्याचे बोलले जात आहे. उद्या (ता. १९) नगरपंचायत निवडणूक निकाल लागेल.