TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गाजीपूर सीमेवर शेतकऱ्यांचा पाणी पुरवठा बंद; सिंघु सीमेवरही मोठा फौजफाटा तैनात

The Clear News Desk by The Clear News Desk
January 28, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीमध्ये मंगळवारी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसेनंतर पोलिस सलग कारवाई करत आहेत. गाजीपूर सीमेवर दिल्ली आणि यूपीचे पोलिस पोहोचले असता सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी गाजीपूर बॉर्डरवरील शेतकऱ्यांना आजच रस्ता रिकामा करण्यास सांगितले आहे. पोलिसांच्या सूत्रांनुसार बॉर्डर रिकामी करण्यासाठी दिल्ली आणि यूपीचे पोलिस जॉइंट ऑपरेशन करु शकतात. तर दुसरीकडे सिंघु सीमेवरही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिस कमिश्नर एस एन श्रीवास्तव यांनी सीनियर अधिकाऱ्यांसोबत मीटिंग केली आहे. पोलिसांनी गाजीपूर सीमेवर लावलेले पोर्टेबल टॉयलेट्स हटवण्यास सुरुवात केली आहे. यूपी रोडवेजच्या डजनभर बस देखील येथे उभ्या करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे बागपतमध्ये ४० दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी बुधवारी रात्री हटवले होते. पोलिसांनी गुरुवारी शेतकरी नेत्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली. म्हणजेच ते विना परवानगी विदेशात जाऊ शकत नाहीत. दरम्यान एका तासानंतर वृत्त आले की, लाल किल्ल्यावर हिंसा करणाऱ्यांवर पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. लुकआउट नोटीस कोणकोणत्या शेतकरी नेत्यांच्या विरोधात जारी करण्यात आली आहे याची पुष्टी झालेली नाही. मात्र असे मानले जात आहे की, ज्या ३७ नेत्यांच्या विरोधात पोलिसांनी बुधवारी FIR दाखल केला होता, त्यांच्याच विरोधात ही नोटीस जारी करण्यात आली आहे. दुसरीकडे, शेतकरी नेता युद्धवीर सिंह यांनी हिसेंच्या घटनेवर माफी मागत म्हटले की, ‘प्रजासत्ताकदिनी जे झाले ते लाजिरवाणे आहे. मी गाजीपूर बॉर्डरजवळ होतो. जे समाजकंटक तिथे घुसले त्यामध्ये आमच्या लोकांचा समावेश नव्हता. तरीही मला हे लाजिरवाणे वाटते आणि ३० जानेवारीला उपवास ठेवून आम्ही प्रायश्चित करु’

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

दिल्लीमध्ये मंगळवारी झालेल्या हिंसाचारामध्ये दिल्ली पोलिसांचे ३०० हून अधिक जवान जखमी झाले. त्यापैकी बरेच जण अद्याप रुग्णालयात दाखल आहेत. यातील काही जवानांची स्थिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी सुश्रुत ट्रॉमा सेंटर येथे भेट दिली.

रॅलीच्या अटी खंडित केल्याच्या आरोपाखाली ३७ शेतकरी नेत्यांविरूद्ध पहिले एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा २० शेतकरी नेत्यांना नोटीस जारी करुन ‘आपल्यावर कायदेशीर कारवाई का होऊ नये, ३ दिवसात याचे उत्तर द्या’ अशी विचारणा करण्यात आली. आतापर्यंत नोटीस दिल्या गेलेल्या ४ नेत्यांची नावे समोर आली आहेत. हे नेते योगेंद्र यादव, दर्शन पाल, बलदेवसिंग सिरसा आणि बलबीरसिंग राजेवाल आहेत. पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्याची तोडफोड करणे देशविरोधी कृती आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

पाळधी येथे एम.टी.पी. उर्दू हायस्कूलमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संघ मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी एटीएसच्या ताब्यात ; नागपूर एटीएसची कारवाई

May 18, 2022

आई-वडिलांचा आत्मा घरात भटकतोय, शांती करावी लागेल ; भोंदू बाबांनी महिलेला १२ लाखांत गंडवले !

November 26, 2023

धरणगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू !

March 14, 2022

अल्पवयीन मुलीसह तरुणीची छेड काढत चाकूहल्ला

May 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group