मुंबई (वृत्तसंस्था) ३ जूनच्या मध्यरात्री मनोज साने याने सरस्वती वैद्यची हत्या केली आणि ४ जूनच्या पहाटेपासून पुढले सलग ४ दिवस तो बाथरुममध्ये बसून मृतदेहाचे तुकडे करत होता. हे तुकडे बाहेर उघड्यावर तसेच फेकून देणे धोकादायक होते. त्यासाठी मनोज हाडे आणि मांस वेगळे करण्यासाठी एकेक अवयव कुकरमध्ये शिजवत होता, अशी खळबळजनक पोलीस चौकशीत समोर आली. मनोज पोलिसांच्या सर्व प्रश्नांची शांतपणे उत्तरे देत होता.
सरस्वतीच्या मृतदेहाच्या डोक्याचेही असंख्य तुकडे !
पोलिसांनी मनोजच्या फ्लॅटमधून सरस्वती यांच्या मृतदेहाचे १७ ते १८ तुकडे हस्तगत गेले होते. मात्र, त्यांचे शिर सापडले नव्हते. मनोजने सरस्वतीचे मुंडके कुठे टाकले, याचा पोलिसांकडून शोध होणे अपेक्षित होते. परंतु, मनोजने चौकशीदरम्या आपण सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाच्या डोक्याचेही असंख्य तुकडे केल्याचे सांगितले. हे सर्व तुकडे पोलिसांनी तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात पाठवले आहेत. आता तपासणीनंतर हे कोणते अवयव होते, हे समजू शकेल. मनोज साने हा कमालीचा शांतपणे वागत असून तपासात सहकार्य करत नाही, असे पोलिसांनी सांगितले.
तुकडे कुत्र्यांना खायला दिलेले नाहीत !
मनोज हा सरस्वतीच्या शरीराचे केलेले तुकडे कुत्र्यांना खायला देत असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. आरोपीने मृत महिलेच्या शरीराचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले हे सत्य आहे. मात्र त्याने ते तुकडे कुत्र्यांना खायला दिलेले नाहीत, असे पोलिस चौकशीत समोर आले आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार मनोज मृतदेहाच्या तुकड्यांना उकळून ते प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरू पाहात होता.
मृतदेहाचे काही तुकडे टॉयलेटमध्ये टाकले का?
आरोपीने मृतदेहाचे काही तुकडे टॉयलेटमध्ये टाकले का? याचादेखील पोलीस शोध घेत आहेत. सध्या त्याला १६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोज साने हा बऱ्यापैकी शिकलेला होता. त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, मनोजलाही दारूचे व्यसन होते आणि तो दिवसभर दारूच्या नशेत असायचा, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या या कृत्यांमुळे त्याच्या दुकानाची कमाई कमी होत होती. या कारणावरून त्यांनी दुकानही बंद केले होते.
मनोज साने आणि सरस्वतीने लग्न का लपवलं होतं?
सरस्वती ३२ वर्षांची होती. तर मनोज साने हा ५६ वर्षांचा आहे. हे दोघं लिव्ह इन पार्टनर असल्याचं समोर आलं होतं. मात्र चौकशी दरम्यान आम्हाला हे समजलं की सरस्वती आणि मनोज साने यांनी लग्न केलं होतं. सरस्वतीच्या बहिणींनाही या लग्नाची माहिती मनोजने दिली होती. मात्र आपलं लग्न झालं आहे ते समाजापासून त्यांनी लपवून ठेवलं होतं कारण मनोज आणि सरस्वती या दोघांमध्ये वयाचं बरंच अंतर होतं. दरम्यान, एका मंदिरात सरस्वती आणि मनोजने लग्न केलं होतं. ज्या अनाथ आश्रमात सरस्वती वाढली त्या अनाथ आश्रमात सरस्वतीने मनोजची ओळख माझा मामा अशी करुन दिली होती. सरस्वतीला आणखी चार बहिणी होत्या. या सगळ्या बहिणी अनाथ आश्रमातच राहिल्या. पाच बहिणींमध्ये सरस्वती ही सर्वात लहान होती. या सगळ्यांची आई त्या लहान असतानाच वारली तर वडील त्यांच्यापासून वेगळे झाले होते.