साप्ताहिक राशिभविष्य, १३ ते १९ मार्च २०२२ : या आठवड्यात राहू केतू मार्गक्रमण करणार आहेत. जाणून घ्या आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल.
मेष :-
सप्ताहात चंद्रबळातून उत्तम लाभ घेणारी रास राहील. सतत ग्रीन सिग्नल मिळतील. भरणी नक्षत्राचं नोकरीतील एक सुंदर पर्व सुरू होईल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींची सप्ताहाची सुरुवात घरात मोठ्या सुवार्तांची. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी संधी. ता. १७ चा गुरुवार गुरुकृपेचा!
वृषभ :-
सप्ताहात ता. १७ ते १९ हे दिवस होळी पौर्णिमेचे स्पंदन निश्चितच रंग बरसे करणारे. नवपरिणीत जोडपी जीवनात मार्गस्थ होतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे सांपत्तिक लाभ. घरात भावाबहिणींचं मंगल होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र मोठ्या दैवी चमत्काराचं! नोकरीत बढती.
मिथुन :-
सप्ताहात चंद्राचं बळ अफलातून परिणाम साधेल, त्यामुळेच गुरुबळाच्याही पार्श्वभूमीचा चांगलाच लाभ उठवणार आहात. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील प्रत्येक सूर्योदयी नवी आध्यात्मिक प्रचिती येईल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार मोठ्या व्यावसायिक प्राप्तीचा. पौर्णिमेजवळ नोकरीच्या उत्तम संधी. प्रेमिकांचं छान स्वप्नरंजन होईल.
कर्क :-
सप्ताह चंद्रबळातून मंगळ-शुक्राची स्पंदनं खेचून घेईल. विवाहस्थळांचा पाठपुरावा करा. नका आणू मध्ये ज्योतिषी! सप्ताहात पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना जबरदस्त इम्युनिटी मिळणार आहे. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठा भाग्योदय. कलाकारांचा कोरोना पूर्ण जाईल. आश्लेषा व्यक्तींनी व्यसनी मित्रांपासून सावध.
सिंह :-
पौर्णिमेचं क्षेत्र विवेकी व्यक्तींना छानच. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. ता. १६ व १७ हे दिवस मोठ्या सुवार्तांची पार्श्वभूमी ठेवतील. पती वा पत्नीची चिंता जाईल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींचं कोरोनापर्व संपेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना संततियोग, मानसन्मान. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाचा योग.
कन्या :-
राशीतील पौर्णिमा आपल्याबाबतीत एक सुंदर पॅकेज राहील. आजचा रविवार हेच लक्षण दाखवेल. विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल. उत्तरा नक्षत्राच्या स्त्रीचं उत्तम सहकार्य. परिचयोत्तर विवाहयोग आहेत. रंग बरसे कराच. हस्त नक्षत्रास सतत लाभ. ता. १९ चा शनिवार अचानक धनलाभाचा. कलाकारांचे भाग्योदय.
तूळ :-
सप्ताहातील चंद्रबळातून शुभग्रहांचा एक उत्तम सूर गवसेल. सप्ताह गीत गाता चल असाच राहील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ व १७ हे दिवस मोठे चमत्कार घडवतील. वास्तुयोग आहेत. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात मोठी भाग्यबीजं पेरेल. तरुणांचा शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून भाग्योदय.
वृश्चिक :-
पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मंगळ शुक्राचा सूर पकडून राहीलच. अर्थातच, लव्हबर्डस एकत्र येतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ ते १८ हे पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र जीवनातील मोठी धावसंख्या रचून देईल. अर्थातच, मोठे भाग्योदय अपेक्षित आहेत. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार मोठ्या सुवार्तांचा.
धनू :-
सप्ताहातील चंद्रबळातून जोरदार मुसंडी मारणार आहात. सप्ताहात गुरुस्मरण करून बाहेर पडत जा! पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १६ ते १८ हे दिवस गिनेस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपला विक्रम नोंदवतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमन. मूळ व्यक्तींना सप्ताहात दंतव्यथा त्रास देतील, काळजी घ्या.
मकर :-
सप्ताहात चंद्रबळ अफलातून राहील. चंद्रबळाची इम्युनिटी घेऊन राशीतील मंगळ-शुक्र एक छान ताल पकडतील. व्यावसायिकांनी कोरोना संपल्यानंतरची फिल्डिंग लावावी. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा प्रारंभ आणि शेवट मोठ्या प्राप्तीचा आणि विजयोत्सवाचा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार उत्तम धुळवडीचा!
कुंभ :-
चंद्रबळाच्या पार्श्वभूमीवर गुरुभ्रमण उत्तम बोलेल. ग्रासून राहिलेली एखादी गुप्तचिंता जाईल. ता. १७ चा गुरुवार शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या भाग्योदयाचा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना आजच्या रविवारचा सूर्योदय मोठा शुभशकुनी. व्यावसायिक धनचिंता जाईल. शनिवार चंगळ, मौजमजेचा.
मीन :-
पौर्णिमा आपल्या राशीस धार्जिण्याच असतात. त्यातूनच पौर्णिमेजवळचा मंगळ-शुक्राचा ताल उत्तम धुळवड साजरी करेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा प्रारंभ आणि शेवट मोठा धनवर्षाव करणारा. पती वा पत्नीचा भाग्योदय रंग बरसे करेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार दैवी प्रचितीचा. होळी पौर्णिमा तीर्थाटनाची. कलाकारांचे भाग्योदय.