मेष : उद्याचे काम आजच करण्याची मानसिकताही असेल. आपली कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी कोणाच्या मागे लागावे लागणार नाही. व्यावसायिकदृष्टय़ा विनाकारण होणारी पळापळ बंद होईल. अगदी नियोजन केल्याप्रमाणे कामे होऊ लागतील. पूर्वीपेक्षा सध्या फायद्याचे प्रमाण वाढलेले असेल. आर्थिक स्थिरता येईल. या आठवडय़ात सर्व दिवस चांगले असतील. कोणत्याही गोष्टीत आळस वाटणार नाही. प्रत्येक कामात उत्साह जाणवेल, त्यामुळे कामे मार्गी लागतील.
वृषभ : काम सोडून कोणत्याही गोष्टीच्या मागे लागू नका. या सप्ताहात चांगली प्रगती होईल हे लक्षात ठेवा. व्यवसायात अपेक्षित वाटचाल राहील. मिळालेला नफा योग्य ठिकाणी गुंतवणे इष्ट ठरेल. नोकरदार वर्गाची कामांमधील धावपळ कमी होईल. आर्थिकदृष्टय़ा परिस्थिती चांगली असेल. दि. २९ रोजी कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सही करणे टाळा. या दिवशी समोरून आलेल्या प्रस्तावाचा स्वीकार करू नका. बाकी दिवस उत्तम असतील आणि या चांगल्या दिवसांमध्ये बरेच काही करायचे आहे हे विसरूनका.
मिथुन : व्यावसायिकदृष्टय़ा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे लागेल. अनोळख्या व्यक्तीबरोबर कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण करू नका. नोकरदार वर्गाला कामाचा मोबदला चांगला मिळेल. खर्च कमी करा. दिनांक ३०, ३१ रोजी संपूर्ण दिवस व १ तारखेला दुपापर्यंत असा हा कालावधी दगदग वाढवणारा आहे. या कालावधीत जाणूनबुजून एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे त्रासाचे ठरेल. संयम ठेवून प्रत्येक गोष्ट करावी लागेल हे मात्र विसरू नका. वादविवादापासून लांब राहा.
कर्क : दि. २ व ३ रोजी कोणतेही काम करताना उशीर होणार आहे, त्यामुळे चिडचिड वाढू शकते. बोलताना स्वत:वर नियंत्रण ठेवा. समोरच्याला समजावून सांगणे म्हणजे वाद होऊ शकतो आणि हा वाद टाळण्यासाठी प्रतिउत्तर देणे टाळा. व्यवसायात प्रगती राहील. नवीन व्यवसायाची सुरुवात करताना योग्य ते नियोजन करा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांनी दिलेल्या कामाचा कंटाळा येईल. अनावश्यक खर्च टाळा. मुलांचे लाड करा, पण नको ते हट्ट पुरवू नका.
सिंह : व्यावसायिकदृष्टय़ा केलेले परिवर्तन फायद्याचे ठरेल. व्यवसायासाठी काढलेले कर्ज फेडण्याची तरतूद कराल. नोकरदार वर्गाच्या कामाची तासिका कमी होईल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात अधिकार गाजवाल. मित्र परिवाराकडून आलेले प्रस्ताव स्वीकारा. संततीविषयक गोड बातमी कळेल. दिनांक ४ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या गोष्टींसाठी वेळ यावी लागते याचा अनुभव मात्र सप्ताहात येईल. बाकी राहिलेली कामे वेळेत पूर्ण होतील. काम करताना कोणताही संघर्ष वाटणार नाही.
कन्या : केलेले नियोजन यशस्वी होईल. प्रत्येक गोष्टीत घाई करण्याची गरज वाटणार नाही. व्यवसायात हिशोब चोख ठेवल्यामुळे व्यवहार मार्गी लागतील. व्यवसायातील परिस्थिती समाधानाची असेल. नोकरदार वर्गाच्या कामात अचूकता राहील. नवीन प्रशिक्षणाची संधी निर्माण होईल. पैशाची चणचण भासणार नाही. उत्साह वाढेलदिनांक २९ रोजीचा एकच दिवस म्हणावं असा अनुकूल नसेल. बाकी नंतरचे दिवस मात्र चांगले असतील. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. सध्या परिश्रम कमी होणार आहेत.मनासारख्या गोष्टी घडू लागतील.
तूळ : परिस्थितीनुसार बदल स्वीकारा हेच हिताचे राहील. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात स्पर्धात्मक गोष्टींच्या आहारी जाऊ नका. मागील कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न वाढवा. नोकरदार वर्गाचा कामाचा आढावा वरिष्ठांकडून घेतला जाईल. आर्थिक बाबतीत अनपेक्षित लाभ होईल. दिनांक ३०, ३१ रोजी संपूर्ण दिवस १ तारखेला दुपापर्यंत अशा या कालावधीत जबाबदारीने वागावे लागेल. ज्या गोष्टींविषयी परिपूर्ण माहिती नाही, अशा गोष्टीची वाच्यता करू नका. प्रत्येक गोष्टीची मर्यादा सांभाळा.
वृश्चिक : स्वत:साठी वेळ द्या. सध्या व्यवसायात मोठे बदल करू नका. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत तडजोड स्वीकारावी लागेल. आर्थिक बाबतीत व्यवहार रोखठोक करा. समाजमाध्यमांचा वापर न केलेला चांगला. प्रत्येक गोष्टीत बारकावा पाहावा लागेल. दुसऱ्यांच्या गोष्टीत हस्तक्षेप करण्यापेक्षा स्वत:कडे लक्ष द्या. कोणाकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वत:हून त्रास ओढवून घेतल्यासारखा आहे. त्यापेक्षा कोणाची अपेक्षा न ठेवता स्वत: कार्यशील राहा.
धनू : व्यवसायातील परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारण्याचा प्रयत्न करा. वनस्पतीजन्य मालाची साठवणूक करू नका. नोकरदार वर्गाला मर्यादा सांभाळाव्या लागतील. आर्थिकदृष्टय़ा कोणत्याही प्रकारे उधार-उसनवारी करू नका. समाजसेवा करा, पण वेळेचे भान ठेवा. घरातील वैयक्तिक गोष्टी कोणासमोर व्यक्त करू नका. नियोजन करून सर्व गोष्टी हाताळाव्या लागतील. क्षुल्लक कारणावरून रागाचा पारा चढू देऊ नका. स्पष्ट बोलण्याने दुसऱ्यांपेक्षा तुम्हाला स्वत:लाच त्याचा त्रास होऊ शकतो. हे लक्षात ठेवा. सध्याचे दिवस पुढे ढकलायचे आहेत, एवढे जरी लक्षात ठेवले तरी त्रासाचे प्रमाण कमी होईल.
मकर : व्यापारी वर्गाने ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यानंतर उत्पादन वाढवण्याचा निर्णय घ्या. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा. सामूहिक गोष्टींची आवड राहील.मित्रपरिवाराशी जेवढय़ास तेवढे राहा. मुलांसाठी वेळ काढावा लागेल. दुखणे अंगावर काढू नका. दिनांक २, ३ रोजी ध्यानीमनी नसताना अचानक वातावरण बदलू शकते. तेव्हा धीर धरून काम करा. वर्तमान स्थितीचा आढावा घ्या. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील.
कुंभ : व्यवसायात नवीन योजनांचा प्रारंभ होईल. उत्पादन वाढीचा वेग वाढेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या संमतीनेच काम करावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. मैत्रीचे नाते दृढ होईल. मुलांकडून योग्य तो प्रतिसाद मिळेल. ३ व ४ तारखेला संपूर्ण दिवस असा हा कालावधी शुभकार्याला सुरुवात करण्यास अनुकूल नाही. या कालावधीत इतरांचा सल्ला घेणे टाळा. कोणतेही निर्णय घेताना भावनिक विचार करू नका. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता दाट आहे. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील.
मीन : द्विधा अवस्था कमी होईल. प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थापन उत्तम जमेल. सध्या व्यवसायात मोठे बदल केले तरी हरकत नाही. शांतपणे निर्णय घ्यायला अवघड वाटणार नाही. व्यावसायिक देणी वेळेत फेडू शकाल.नोकरदार वर्गाला कामात उत्साह वाटेल. आर्थिकदृष्टय़ा झालेली कोंडी कमी होईल. राजकीय क्षेत्रात तुमचे पारडे जड होईल. भावंडांच्या बाबतीत एखादी गोष्ट पटली नाही तर सोडून द्या. त्यावर फारसा विचार करू नका. सप्ताहात शुभ ग्रहांची साथ चांगली मिळेल. सर्व दिवस चांगले जातील. मागील काही दिवसांपासून काही दिवस चांगले असतानासुद्धा, मानसिक अस्वस्थता जाणवत होती, ती आता जाणवणार नाही. (Weekly Horoscope 29 January to 4 February 2023)















