मेष : बौद्धिक क्षेत्रात तुमची विशेष प्रगती होईल. मनोबल वाढेल. आठवडय़ात तणाव, चिंता, वादविवाद यासारखे प्रसंग घडत राहतील. रागावर ताबा ठेवा. अहंकार नको. प्रवास सुखकर होणार आहेत. सर्वत्र कायद्याच्या चौकटीत राहून कृती करा. नोकरीत दगदग होईल. धंद्यात गोड बोला. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. काहींना अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होणार आहे. हा आठवडा मेष राशीसाठी रोमान्स आणि प्रेमाने भरलेला असेल. प्रेमसंबंधात सुखद अनुभव येतील.
वृषभ : पाकिट सांभाळा. मैत्रीत, नात्यात तणाव येईल. नोकरीत हुशारी दिसेल. धंद्यात चर्चेत यश मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मनोबल उत्तम राहील. आजचा दिवस आपणाला अधिक सुखकर असणार आहे. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे विनासायास मार्गी लागणार आहेत.
मिथुन : खर्चावर निर्णय ठेवणे कठीण होईल. घरातील वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. नोकरीत कट कारस्थान होतील. जिद्द व चिकाटी वाढेल. आज तुमचे मनोबल विशेष असणार आहे. धंद्यात हिशेबात चूक नको. वसुली करा. गोड बोलून कठीण कामे करण्याचा प्रयत्न करा. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
कर्क : रागाच्या भरात कुणालाही दुखवू नका. सौम्य धोरण ठेवा. प्रवासात घाई नको. अपरिचित व्यक्ती समवेत जपून वागा. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात वाढ नको. मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहकारी, नेते यांना विसरू नका. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. दैनंदिन कामे यशस्वी होतील.
सिंह : प्रत्येक दिवस उत्साहवर्धक असेल. संयम, सहनशीलता ठेवल्यास मोठे यश मिळेल. प्रवासात घाई नको. गेल्या दोन दिवसांपासून जाणवत असणारी अस्वस्थता आज कमी होईल. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. कोणतेही विधान कायद्याला धरून करा. नवीन परिचय प्रेरणादायी ठरतील. गेले दोन दिवस रखडलेली कामे पूर्ण करू शकणार आहात.
कन्या : तुम्ही ठरवलेले कार्य नेटाने पूर्ण करता येईल. क्षुल्लक वादाला, गैरसमजाला महत्त्व देऊ नका. नोकरीत बुद्धिचातुर्याची प्रशंसा होईल. मनोबल कमी असणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थता राहील. प्रगती होईल. बढती मिळेल. धंद्यात पैसा सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भावनेच्या आहारी जाऊ नका. आज तुमचे कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. दैनंदिन कामे रखडणार आहेत.
तुळ : मोठेपणाच्या आहारी न जाता कोणताही व्यवहार करा. नोकरीत सतर्क रहा. चूक टाळता येईल. मनोबल चांगले असणार आहे. आपल्याला अनेकांचे सहकार्य लाभेल. आपले मत आपण इतरांना पटवून देणार आहात. नवीन परिचय उत्साहवर्धक, प्रेरणादायी ठरतील. धंद्यात वसुली होईल. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. बौद्धिक क्षेत्रात आपली विशेष प्रगती होईल. प्रवास सुखकर होतील.
वृश्चिक : उत्साह, आत्मविश्वास वाढल्याने राहून गेलेले यश मिळवता येईल. कौटुंबिक सुखात भर पडेल. नोकरीधंद्यात मनाप्रमाणे सुधारणा होईल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. चांगला भागीदार मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. आपली मते आपण इतरांना पटवून देऊ शकणार आहात. प्रवास सुखकर होतील. दैनंदिन जीवनात आपल्याला सौख्य व समाधान लाभेल.
धनु : प्रकृतीची काळजी घ्या. कुटुंबात धावपळ, दगदग होईल. दुखापत टाळा. यशाचा मार्ग मिळेल. कायद्याच्या विरोधात जाऊन कोणतेही काम करू नका. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. गेले दोन दिवस असणारी मानसिक अस्वस्थता आज कमी होईल. नोकरीत व्याप होतील. धंद्यात खर्च होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेवर टीकात्मक चर्चा होईल. प्रवास सुखकर होतील. काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येईल.
मकर : जवळच्या व्यक्ती टीका करून तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करतील. रागाच्या भरात संबंध बिघडवू नका. आज आपल्याला कोणतीतरी मानसिक चिंता सतावेल. प्रवास शक्यतो टाळावेत. नोकरीत प्रभुत्व वाढेल. तुमच्या परिश्रमाची कदर होईल. धंद्यात नुकसान टाळता येईल. नवे काम मिळवाल. तुमच्या मनावर भावनिक दडपण राहील. आज कोणतेही महत्त्वाचे काम करण्याचे टाळावे.
कुंभ : विरोधक मैत्रीची भाषा करण्यास येतील. प्रेरणादायक घटना घडेल. नोकरीत प्रगती होईल. ओळखीतून कामे करून घेता येतील. आरोग्य सुधारेल. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. धंद्यातील समस्या सोडवाल. कुणालाही कमी न लेखता ध्येय गाठा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जनसंपर्क वाढेल. प्रतिष्ठा मिळेल. वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
मीन : अनेक कामांना वेगाने पुढे नेता येईल. क्षुल्लक वादाला महत्त्व देऊ नका. नोकरीधंद्यात सुधारणा होईल. प्रगती होईल. आज आपल्याला काही अनावश्यक कामे करावी लागतील. त्यामुळे तुमचे मन आज नाराज राहण्याची शक्यता आहे. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज, तणाव दूर करून कामे करता येतील. नवीन योजना सुरू करू शकाल. प्रवास आज नकोत. मनोबल कमी राहील. खर्च वाढणार आहेत.