मेष : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत आशादायी आहे. एखादी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने आपणास कार्यात यश प्राप्त होईल. व्यापारात जलदगतीने प्रगती होईल. आपल्या व्यवसायात लाभाची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ सुद्धा मिळेल. आपण आपल्या कष्टांसाठी प्रसिद्ध व्हाल, व त्यामुळे आपणास कोणत्याही समस्येस सामोरे जावे लागणार नाही. आपण आपल्या विरोधकांवर मात करू शकाल. जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये. नवीन गोष्टी आमलात आणाव्यात.
वृषभ : आपण प्रत्येक काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यास प्राधान्य द्याल. नोकरी करणाऱ्यांना ह्याचा मोठा फायदा होऊन कामात प्रगती होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपला व्यावसायिक भागीदार आजारी पडण्याची शक्यता असून आपणास आपली कामे स्वतःलाच करावी लागतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपणास वैवाहिक जोडीदाराची काळजी सतावेल. आपल्या खर्चात वाढ होण्याची संभावना असल्याने आपणास त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.उगाचच भांडणात पडू नका. घरात खबरदारी घेऊन काम करावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता. धैर्याने परिस्थिती हाताळावी.
मिथुन : आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपणास भविष्यात फायदा होऊ शकेल अशी एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक सुद्धा आपण करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या अनुभवाचा फायदा होईल. आपण आपल्या कामात प्रगती कराल. प्रकृतीत चढ – उतार येतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. एकमेकांप्रती जवाबदारीची जाणीव राहील. मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल.
कर्क : ह्या आठवड्यात कामात यश प्राप्तीची शक्यता धूसर असल्याने कोणतेही मोठे कार्य हाती घेऊ नये. खर्चात वाढ होईल. प्राप्ती कमी व खर्चात वाढ झाल्याने आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. आपल्या उत्तम मनोबलामुळे आपण त्यांचा सामना करू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. वडीलधार्या मंडळींची काळजी घ्यावी. दिनक्रम व्यस्त राहील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका.
सिंह : आपल्या आशा पल्लवित होतील. आपण अग्रस्थानी राहून कामे करण्यास प्राधान्य द्याल. आपणास आव्हानांना सामोरे जाण्यास आवडेल. आपण स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होऊ शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपणास वैवाहिक जीवनातील अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. सासुरवाडीकडील लोकांशी सलोखा राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. घरात शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तू खरेदी कराल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.
कन्या : प्रेमीजनांसाठी आठवड्याचे मधले दिवस आनंददायी आहेत. आपली प्रेमिका तिची इच्छा आपल्या समोर व्यक्त करेल. त्यामुळे आपल्या मनात तिचा आदर वाढेल. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात तटस्थता जाणवेल. ते आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या सल्ल्याने अनेक कामे करतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आपल्या ज्ञानात भर पडून आपण नवीन काही शिकू शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. सर्वत्र आनंद शोधाल. अचानक खर्च उद्भवू शकतात.
तूळ : एकाच वेळी अनेक कार्ये करण्यास आपले प्राधान्य असले तरी आपणास यशस्वी होण्यासाठी प्राधान्यक्रम देऊनच कामे करावी लागतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती जलदगतीने काम करून त्यात नैपुण्य मिळवू शकतील. व्यवसायात तेजी येऊन आपले अनेक प्रकल्प यशस्वी होतील. त्यात आपणास चांगला नफा होईल. आपण पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळवू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अधिकारात वृद्धी होईल.
वृश्चिक : आपल्या प्रकृतीत चढ – उतार येतील. तेव्हा प्रकृतीकडे लक्ष द्यावे. अन्यथा आपले नुकसान संभवते. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त राहील. हे तणाव दूर करणे आपल्या हाती राहील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. प्रणयी जीवनातील समस्या दूर होऊ लागतील. आपण आपल्या प्रेमिके समोर मनातील भावना व्यक्त करू शकाल. त्यामुळे ती सुद्धा आपले प्रेम व्यक्त करेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. केलेला संकल्प पूर्ण होईल. आपले विचार लोकांसमोर मांडाल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. अनावश्यक खर्च उद्भवतील.
धनू : आपले जीवन सुखावह होईल. आपण मनापासून खुश झाल्याने प्रत्येक कार्यात यशस्वी व्हाल. आपली प्राप्ती सुद्धा चांगली होईल, व त्यामुळे आपण आर्थिक दृष्ट्या प्रबळ व्हाल. कौटुंबिक जीवन आनंददायी होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा मिश्र फलदायी आहे. आपल्या संबंधात प्रेम व रोमांस असला तरी काही लोकांच्या वाकड्या नजरेचा परिणाम आपल्या प्रणयी जीवनावर होऊन आपल्या संबंधात काही समस्या निर्माण होतील. आपला आत्मविश्वास कायम ठेवा. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक गोष्टींचा अनुभव घ्याल. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
मकर : पैश्याची आवक झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नशिबाची साथ आपणास कार्यात यश प्राप्त करून देईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थी आपल्या अभ्यासाप्रती खूपच गंभीर होतील. त्यांच्या अभ्यासात सतत अडथळे निर्माण होण्याची संभावना असल्याने त्यांना गंभीर व्हावेच लागेल. कौटुंबिक वातावरणामुळे अभ्यासात अडथळे येऊ शकतात , तेव्हा सावध राहावे. आपला संयम कमी येईल. अति साहस दाखवू नका. आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.
कुंभ : आठवड्याच्या सुरवातीपासून आपण आपले संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित करून आपला पूर्ण वेळ त्यासाठी खर्च कराल. आठवड्याच्या मध्यास आपण मित्रांना भेटून आपले सामाजिक वर्तुळ वाढविण्याचा प्रयत्न कराल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात खर्चात वाढ होईल. ह्या आठवड्यात गुंतवणूक कोठे व कशी करावी हे न समजल्याने आपणास गुंतवणूक करणे शक्य होणार नाही. तसेच सध्या गुंतवणूक करणे हितावह होणार नाही. आपणास आपल्या व्यावसायिक भागीदारांशी सलोखा राखावा लागेल, अन्यथा ते परिस्थितीचा दुरुपयोग करण्याची संभावना आहे. कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल. व्यवसाईकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा.
मीन : विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात आनंदित राहिले तरी सासुरवाडी कडील लोकांशी थोडा वाद संभवतो. ह्यात आपला वैवाहिक जोडीदार त्यांच्या कुटुंबाची बाजू घेईल, ज्यामुळे आपल्या दोघात वाद होण्याची संभावना आहे. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनात खुश राहतील. आपल्यातील समस्या दूर होऊ लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगतीचा मार्ग सापडेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. पदोन्नतीचे योग संभवतात. घरात अतिथी जमतील.