मेष : आपण आपल्या मित्रांसह व कुटुंबियांसह धार्मिक यात्रा करण्याचा एखादा बेत आखाल, ज्यामुळे सर्वजण अत्यंत खुश होताना दिसतील. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. प्रवासाचे योग येतील. मनोबल वाढेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात जे काही उधारीचे व्यवहार बाकी होते ते पूर्ण होतील. नोकरदार वर्गाच्या कामकाजात पारदर्शकता येईल.
वृषभ : ह्या आठवड्यात आपणास प्राप्तीचे नवीन स्रोत प्राप्त होतील, ज्यामुळे आपण मोठा लाभ मिळवून आपली आर्थिक स्थिती मजबूत कराल. काही अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. प्रवास टाळावेत. तुमची भूमिका स्पष्ट असली तरी ती इतरांना आवडणार नाही. सध्या ही वेळच नाही. तेव्हा प्रत्येक गोष्टीत समतोल राखायला हवा.
मिथुन : ह्या आठवड्यात व्यापारी त्यांच्या व्यापारात काही नवीन योजना अंमलात आणतील. ह्या आठवड्यात विद्यार्थी एखाद्या स्पर्धेची तयारी करताना दिसतील.बौद्धिक प्रगती होईल. मनोबल चांगले राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. नोकरदार वर्गाला कामाचा ताणतणाव जाणवू लागेल. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. कुटुंबातील सदस्यांशी बोलताना शब्द जपून वापरा.
कर्क : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कलात्मक व रचनात्मक क्षेत्रात सुद्धा वृद्धी होत असल्याचे दिसून येईल. ह्या आठवड्यात आपण वैवाहिक जोडीदारासह काही वेळ एकांतात घालवाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. कामाचा ताण कमी राहील. व्यवसाय वाढेल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. कोणाकडून अपेक्षा ठेवली तर ती पूर्ण होणार नाही. तेव्हा अपेक्षा न ठेवता आपले काम आपणच करा. त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील.
सिंह : ह्या आठवड्यात आपणास धन प्राप्तीची संधी सुद्धा मिळेल, जी उचलून आपण आपली आर्थिक स्थिती मजबूत कराल. आपण एखादे घर, दुकान किंवा वास्तू खरेदी करण्याचा बेत ठरवाल. प्रवास होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे अपेक्षेपेक्षा चांगले असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यश मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा.
कन्या : विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्याने त्यांचे अभ्यासातील लक्ष कमी होईल. मुलांच्या भविष्या बद्धल माता – पिता चिंतीत होतील. प्रकृतीत पहिल्यापेक्षा थोडी सुधारणा होईल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. मनोबल वाढेल. नोकरदार वर्गाच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर होतील. आर्थिक बाबतीत व्यवहार मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात व्यासंग उत्तम राहील.
तूळ : ह्या आठवड्यात आपण व्यापार वृद्धीसाठी जो प्रयत्न करत होता, त्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वडील मंडळींचे आशीर्वाद आपणास प्राप्त होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. प्रवासाचे योग येणार आहेत. वैवाहिक सौख्य लाभेल. अस्थिर वाटणाऱ्या गोष्टी स्थिर होऊ लागतील. प्रत्येक गोष्टीत स्वत:हून पुढाकार घ्याल. त्यामुळे कामातील अडथळे दूर होतील. इतरांची मदत वेळेत मिळेल.
वृश्चिक : ह्या आठवड्यात विद्यार्थी अभ्यासातील काही विषयातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी गुरुजनांची मदत घेतील. त्यांना ह्या आठवड्यात त्यांच्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. मनोबल चांगले ठेवणे गरजेचे आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घेणे गरजेचे आहे. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. नोकरदार वर्गाला कामाचा मोबदला चांगला मिळेल. आर्थिक बाबतीत नियोजन केल्यास पैशांची बचत होईल. राजकीय क्षेत्रात असलेला दबाव कमी होईल.
धनु : घरात एखाद्या नवीन पाहुण्याचे आगमन होईल, ज्यामुळे खुशीचे वातावरण निर्माण होईल. एखाद्याचा विवाह ठरेल. मंगल कार्याचे आयोजन होईल. कामाचा ताण कमी होईल. काही अनपेक्षित गाठीभेटी पडतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. नवीन परिचय होतील. व्यवसायातून जे उत्पन्न मिळणार आहे त्याची गुंतवणूक त्वरित करा. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी इतरांवर सोपवून चालणार नाही. खर्च जपून करा.
मकर: वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतील. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. ह्या आठवड्यात त्यांना त्यांच्या आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल. कामे मार्गी लागणार आहेत. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. मनोबल उत्तम राहील. आपले नियम, तत्त्व तात्पुरते बाजूला ठेवल्यास हे समाधान मिळू शकते. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. ही अमावास्या मागील काही गोष्टींचे भांडण उकरून काढणारी आहे.
कुंभ: ह्या आठवड्यात आपण आपले एखादे स्वप्न पूर्ण कराल, व त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल. नवीन वाहन सौख्य सुद्धा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जिद्द वाढेल. आरोग्य उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. बाकी दिवसांचा कालावधी अतिशय शुभदायक राहील. या चांगल्या कालावधीमध्ये सुवर्णसंधी मिळेल. अमावास्या लाभस्थानातून होत आहे. या कालावधीत दानशूर वृत्ती राहील.
मीन: ह्या आठवड्यात वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या वैवाहिक जोडीदारास एखादे नवीन कार्य करावयास लावू शकता. विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत असल्याचे दिसून येईल. कामे विलंबाने होतील. कामाचा ताण राहील. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास टाळावेत. मनोबल कमी राहणार आहे. व्यवसायात मोठया प्रमाणात उलाढाल होईल. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीची जबाबदारी मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल.
















