TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ७ ते १३ मे २०२३ !

जाणून घ्या...हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 7, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यवसायामध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक कराल. या गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात स्पष्टवक्तेपणा टाळा. दिनांक ७, ८ या दोन दिवसांत इतरांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही आणि नेमके तेच घडणार आहे. त्यामुळे हा संवाद शांततेने हाताळा. संवाद साधताना कठोर वाणी टाळा. महत्त्वाच्या काही गोष्टी करावयाच्या असल्यास हे दोन दिवस सोडून करा. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील.

वृषभ : व्यावसायिकदृष्टय़ा सक्षम बनाल. व्यवसायातील आवक-जावक वाढेल. नोकरदार वर्गाला नवीन काम मिळेल. आर्थिकदृष्टय़ा आणि अपेक्षित लाभ होईल. दिनांक ९, १० हे दोन दिवस मिळतेजुळते घ्यावे लागेल. कारण नसताना किरकोळ गोष्टीवरून वाद होऊ शकतो. हा वाद होऊ नये असे वाटत असेल तर स्वत:ची तत्त्वे सध्या तात्पुरती बाजूला ठेवा. त्यामुळे अडचण येणार नाही. विरोधी भूमिका टाळा. कामासाठी धावपळ झाली तर चिडचिड करू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : ठरवून कुठलीही गोष्ट साध्य होत नाही याचा अनुभव येईल. कोणतेच काम वेळेत होणार नाही. त्यामुळे अंगातील आळस वाढणार आहे. या कालावधीत ध्यानीमनी नसताना वादग्रस्त विषय समोर येऊ शकतात. अशा वेळी आपली भूमिका ही वाद घालण्यासाठी ठाम असते. सध्या ग्रहमान चांगले नाहीत हे विसरू नका. इतरांपेक्षा तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा शांत राहा. सर्व दिवसांचा कालावधी जपून हाताळा. व्यवसायात नवी उलाढाल करूच नका. नोकरदार वर्गाने कामात व्यस्त राहा.

कर्क : रागाच्या भरात तोंडातून गेलेला शब्द पुन्हा परत येणार नाही; तेव्हा बोलताना शब्द जपून वापरा. व्यावसायिकदृष्टय़ा धावपळ होईल. ही धावपळ होऊ नये असे वाटत असेल तर व्यावसायिक नियोजन व्यवस्थित करा. नोकरदार वर्गाच्या कामातील गती वाढेल.अनावश्यक खर्च टाळा. दिनांक ९ आणि १०, १३ असे हे दिवस चांगले की वाईट याचा विचार न करता निर्णय घ्याल. त्यामुळे अडचणी वाढू शकतात. प्रत्येक गोष्ट विचाराने करावी लागेल. आपले काम साध्य करायचे आहे. तिथे गोड बोलून करावे लागेल.

सिंह : वारंवार जुन्या गोष्टीच्या तळामुळाशी जाऊ नका. नको त्या भानगडी वाढवू नका. सकारात्मक विचार करा. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. खरेदी-विक्री व्यवसायात फायदा होईल. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा व खर्च सांभाळा. मैत्रीचे नाते दृढ होईल. संतती सुख लाभेल. घरातील वातावरण हसते-खेळते राहील. दिनांक ११, १२ रोजी आपल्याला झेपेल अशाच गोष्टींना हात घाला. न झेपणाऱ्या गोष्टींच्या मागे लागू नका. कोणावर अवलंबून कोणतीच गोष्ट होणार नाही. जे काही करायचे आहे ते स्वत:लाच करायचे आहे हे विसरू नका.

कन्या : तुमच्या परस्पर नकळत कोणतेही झालेले बदल स्वीकारायला तुम्हाला अवघड जाते; पण सध्या हे बदल पटकन स्वीकारून कामाला लागणे अशीच परिस्थिती निर्माण होईल. व्यवसायातील कसरत कमी होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. आर्थिकदृष्टय़ा परिस्थिती चांगली असल्यामुळे मनासारखी खरेदी कराल. दिनांक १३ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. या चांगल्या दिवसांमध्ये बरेच काही करायचे आहे. तेव्हा वेळ वाया घालवू नका.

तूळ : या आठवड्यात तुमची प्रतिभा उंचावणार आहे, असे म्हणायला हरकत नाही. यशस्वी वाटचालीसाठी जे प्रयत्न करत होता त्या प्रयत्नांना आत्तापर्यंत यश मिळत नव्हते. हे यश आता मिळणार आहे. नवीन घडामोडींची सुरुवात होईल. स्वकर्तृत्व सिद्ध होईल. अडथळय़ांचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे पुढील कामाचा आराखडा तयार करता येईल. व्यावसायिकदृष्टय़ा केलेले व्यवहार मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात चाललेल्या घडामोडींत चांगले बदल घडतील. नोकरदार वर्गाला काम करताना उत्साह वाटेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

वृश्चिक : एखादी गोष्ट जमत नाही म्हणून तुम्ही प्रयत्न सोडत नाही. त्याचा पाठपुरावा करून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. सध्या पाठपुरावा करण्याची गरज भासणार नाही. सहज, सरळमार्गे कामे होत राहतील. हाती घेतलेले कार्य सिद्धीस जाईल. व्यवसायात चालून आलेली संधी सोडू नका. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा प्रतिसाद मिळेल. आर्थिक अडचणी दूर होतील. या सप्ताहातील सर्व दिवसांचा कालावधी चांगला राहील. प्रत्येक गोष्टीत स्वत:चेच वर्चस्व गाजवाल. परंतू समोरच्याला ऐकून घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

धनू : प्रत्येक गोष्ट घाईगडबडीने करायची सवय सोडून द्या. स्पष्टवक्तेपणा टाळा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. व्यवसायात इतर मार्गातून आलेले प्रस्ताव स्वीकारताना विचार करा. आपली आवक-जावक पाहून मगच गुंतवणूक करा. नोकरदार वर्गाने आपले काम इतरांच्या जबाबदारीवर न टाकता स्वत:च केलेले चांगले राहील. खर्च आटोक्यात ठेवा. दिनांक ७ आणि ८ असे हे दोन दिवस काही काम नसतानासुद्धा भटकंती करावीशी वाटेल; पण ही भटकंती टाळा, अन्यथा शारीरिक परिणाम होऊ शकतो. इतरांना मदत करताना परिस्थितीचे भान ठेवा. स्वत:हून स्वत:चे नुकसान करून घेऊ नका.

मकर : आळस बाजूला सारून कामाला लागा. ज्या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायच्या असतात अशा ठिकाणी गप्प राहता व ज्या ठिकाणी द्यायच्या नाहीत अशा ठिकाणी मात्र पटकन प्रतिक्रिया देता, हा स्वभावगुणधर्म बदला. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. व्यवसायात चढउतार असला तरी फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला अनुभवातून शिकावयास मिळालेल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. खर्च जपून करा. दिनांक ९, १० या दोन दिवसांत मन स्थिर ठेवा. आपली इच्छा नसताना काही गोष्टी समोर येणार आहेत. परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला शिका.

कुंभ : कोणतेही काम करण्यापूर्वी आधी त्या कामाचा आराखडा तयार करा. मगच कामाला सुरुवात करा. त्यामुळे कोणते काम अडणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यावसायिकदृष्टय़ा भरभराट राहील. व्यवसायात घेतलेले निर्णय यशस्वी होतील. नोकरदार वर्गाच्या मनोकामना पूर्ण होतील. आर्थिकदृष्टय़ा व्यवहार रोखठोक करा. दिनांक ११, १२ अशा या दोन दिवसांचा कालावधी ‘धरले तर चावते सोडले तर पळते ’ अशी परिस्थिती निर्माण होईल. काय करावे, कोणता निर्णय घ्यावा हे सुचणार नाही. सध्या घाई करून कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. प्रत्येक गोष्टीत संयम महत्त्वाचा राहील.

मीन : चांगले दिवस असले की, जी महत्त्वाची कामे करायची असतात ती विसरून जाता आणि नको त्या कामात गुंतून राहता. या चांगल्या दिवसाला सुवर्णसंधी समजा व कुठेही कमी पडू नका. तुम्ही केलेल्या कामाबद्दल तुम्हाला शुभेच्छा मिळतील. व्यावसायिकदृष्टय़ा एखादी गोष्ट ठरवून करायची म्हटली तर होत नव्हती, पण सध्या ती होणारी आहे. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत दिलासा मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. १३ तारखेचा एकच दिवस फारसा अनुकूल नाही, पण बाकीचे दिवस खूप चांगले असतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात ; वृद्ध आई-वडिलांनी गमावला एकुलता एक मुलगा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा एक अटकेत ; दुसरा फरार

September 26, 2020

अल-कायदाच्या ९ जणांना अटक; एनआयएची पश्चिम बंगाल अन् केरळमध्ये छापेमारी

September 19, 2020

अत्तरदे फाऊंडेशनच्या मदतीने बायपॅप व ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर मशीनचे लोकार्पण

September 4, 2021

नांदुरा : संभाजी ब्रिगेडचा उद्या तालुकानिहाय जनसंवाद दौरा !

November 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group