मेष : आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आकस्मिक मोठा धनलाभ होईल. आठवड्याच्या सुरुवातीला आपण मानसिक तणावात असाल. व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे.आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुमचा व्यावसाय सुधारेल, तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. कौटुंबिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना गुप्त वार्ता समजतील. नोकरीत वरिष्ठ अडचणीत आणतील. नम्रता ठेवा.
वृषभ : या आठवड्यात व्यवसायाशी संबंधित प्रवासातून तुम्हाला लाभ मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला कामाचे ओझे जास्त राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. आठवड्याच्या शेवटी गुंतवणूक करणं तुमच्यासाठी तोट्याचं ठरू शकतं. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. नोकरीधंद्यात लाभ, सुधारणा होईल. वरिष्ठांचे मन जिंकता येईल.
मिथुन : आठवड्याच्या मध्यात व्यवसायात काही नवीन डील फिक्स होतील. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. निरुत्साही राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुमची लव्ह लाईफ उत्तम राहील. महत्त्वाची कामे आज नकोत. आठवड्याच्या सुरुवातीला कामकाजात काही अडचणी येतील. कौटुंबिक जीवनात मनःस्ताप संभवतो. काहींची अनावश्यक कामे करावी लागल्याने चिडचिड होणार आहे. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. धंद्यात जम बसेल.
कर्क : नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आठवड्याच्या मध्यात विरोधक तुम्हाला काही प्रमाणात अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांना यश मिळणार नाही. आठवड्याच्या मध्यावर काम जास्त राहील. कला व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला जाणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. मैत्रीत, नात्यात तणाव, वाद, चिंता होतील. स्वतच्या प्रकृतीची काळजी घ्या.
सिंह : आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण होतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आठवड्याच्या मध्यात घरात आनंदी वातावरण असेल, तुम्ही काही पार्टी वगैरे करू शकतात. पदोन्नती आणि आर्थिक लाभाचे योग आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत सहनशीलता ठेवा.
कन्या : या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती आशादायक दिसते. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या योजनेवर काम करत असाल तर तुम्ही केलेल्या प्रयत्नांची पावती मिळेल. प्रवासाचे योग येतील. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहू शकाल. मनोबल उत्तम राहील. प्रकृतीची काळजी घ्या. कोणालाही कमी लेखू नका. नोकरीत बुद्धीची चमक दिसेल.
तुळ : आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित शुभवार्ता मिळणे सुरू होईल. या आठवड्यात कोणतीही गुंतवणूक केली असल्यास, तुम्हाला लवकरच चांगला परतावा मिळू शकेल. अवाजवी खर्चापासून सावध राहा. मनाविरुद्ध घटना घडेल. मानसिक ताण-तणाव राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कौटुंबिक जीवनात वादविवाद टाळावेत. आठवड्याच्या उत्तरार्धात उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होतील, त्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. प्रवासात काळजी घ्यावी. नोकरीच्या कामात सावध रहा. जवळच्या व्यक्ती स्पर्धा करतील. धंद्यात लाभ होईल.
वृश्चिक : या आठवड्यात कोणत्याही नवीन प्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा महत्त्वाची मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकणार आहात मनोबल व आत्मविश्वास वाढविणारीआठवड्याच्या शेवटी वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. घटना घडेल. कामाचा ताण जाणवेल. अनावश्यक धावपळ आणि खर्चामुळे तुमचे मन थोडो उदास होईल. व्यवहारिक दृष्टिकोन स्पष्ट ठेवा. स्वतच्याच मनाला रुचेल असा हीशेब चुकीचा ठरेल. नोकरीत स्पर्धा करणारे वाढतील.
धनु : या आठवड्यात तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. अनावश्यक कामे करावी लागणार आहेत. तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. मनःस्ताप संभवतो. उत्पन्न वाढल्यामुळे तुमचा आत्मविश्वासही उंचावला जाईल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या मित्राच्या मदतीने एखाद्या लाभदायक योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मानसिक स्वास्थ्य जपावे. अनावश्यक ताण घेऊ नये. नोकरीत क्षुल्लक तणाव जाणवेल. धंद्यात लाभ, कायदा पाळा. राजकीय, सामाजिक कार्य करताना ध्येयावर लक्ष ठेवा.
मकर : आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्चामुळे तुम्हाला मानसिक त्रास जाणवेल.मुला-मुलींच्या प्रगतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुमचं कोणाशी तरी भांडण होऊ शकतं.कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. घरी आईवडिलांचे पूर्ण सहकार्य आणि समर्थन मिळेल. बौद्धिक क्षेत्रात क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. नोकरीत वर्चस्व, व्याप वाढेल. धंद्यात वाढ होईल. अहंकाराने बोलू नका.
कुंभ : आठवड्याच्या मध्यात तुम्हाला व्यवसायातून चांगला नफा मिळेल, पैशांची आवक वाढेल. नोकरी, व्यवसायात स्वास्थ्य व समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रॉपर्टी, गुंतवणुकीस अनुकूलता लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. आठवड्याच्या सुरुवातीला करिअरच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. या काळात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. कामाचा व्याप वाढेल. नोकरीत प्रगती होईल. बदल घडेल. धंद्यात वाढ होईल. वसुली करा.
मीन : आठवड्याच्या मध्यात करिअरवर लक्ष केंद्रित करावं लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. काहींना नवा मार्ग दिसेल. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास दिवस अनुकूल आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत वैवाहिक जीवन सुखाचं असेल.पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा नफा होईल. व्यापाराशी संबंधित लोक बाजारातील तेजीचा लाभ उठवतील. मनोबल वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. मित्र, नातलग यांच्यात गैरसमज, दुरावा येईल. आरोग्याची काळजी घ्या. धंद्यात खर्च होईल. नुकसान टाळा.