मेष : नोकरीत बुद्धिमत्तेचा वापर करा. धंद्यात भावनेपेक्षा कर्तव्यपालन करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तीचा सहवास लाभेल. या आठवडय़ात सर्वच दिवस चांगले असतील. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. बोलताना नकळत आपल्याकडून एखादी व्यक्ती दुखावली जाणार नाही याची काळजी घ्या. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत आघाडी मिळवता येईल. व्यावसायिकदृष्टय़ा भरभराट होईल. नोकरदार वर्गाचे कामात लक्ष लागेल. आर्थिक टंचाई जाणवणार नाही.
वृषभ : राजकीय, सामाजिक क्षेत्रात दूरदृष्टिकोनातून ठेवा. पद मिळण्याची आशा निर्माण होईल. वरिष्ठांची मर्जी पाहून शब्द टाका. दिनांक ३, ४, ५ या दिवसांत मनस्ताप वाढू नये, याची काळजी घ्या. व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळेल. आर्थिकदृष्टय़ा खर्च कमी करा. समाजमाध्यमांचा वापर योग्य पद्धतीने करा. नवीन ओळखीचा फायदा होईल.
मिथुन : राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढवा. लोकसंग्रह वाढवा. अधिकार लाभतील. स्पर्धेत यश मिळेल. कौटुंबिक कामे होतील. ५ तारखेला दुपारनंतर, ६ व ७ हे संपूर्ण दिवस असा हा अडीच दिवसांचा कालावधी चांगला आहे असे म्हणता येणार नाही. नोकरदार वर्गाला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात यश मिळेल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले राहील. नवीन योजना अमलात आणाल. आर्थिकदृष्टय़ा खर्चाच्या बाबी लक्षात घ्या. कुठेही अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी घ्या.
कर्क : नोकरीधंद्यात लाभदायक घटना घडेल. दिग्गज व्यक्तींचे सहकार्य लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भाषणाचा प्रभाव पडेल. डावपेच यशस्वी होतील. स्पर्धेत यश मिळेल. दिनांक ८, ९ हे दोन दिवस तुमच्यासाठी चांगले आहेत. व्यावसायिकदृष्टय़ा खरेदी- विक्री व्यवहार करताना जपून करा. व्यवसायातील डावपेच वेळीच लक्षात घेतल्यास नुकसान होणार नाही. व्यवसायात एकाच गोष्टीवर अवलंबून राहू नका. अनेक माध्यमांतून लाभ मिळतील.
सिंह : नवीन परिचयावर भाळू नका. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यात फसगत टाळा. स्पर्धा यशदायी ठरेल. कामे अगदी सहज मार्गी होत जातील. तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा असणार आहे. या संधीचा फायदा घ्या. व्यापारी वर्गाला कितीही अंदाज असला तरी मोठे धाडस करून चालणार नाही. आर्थिक व्यवहार जपून करा. सार्वजनिक ठिकाणी हस्तक्षेप करणे टाळा. नातेवाईकांच्या वैयक्तिक गोष्टीत पडू नका.
कन्या : कायद्याच्या कक्षेत राहून वक्तव्य करा. बेकायदेशीर कृत्य टाळा. स्वतची काळजी घ्या. दिनांक ३, ४, ५ असे हे तीन दिवस म्हणजे तुमच्यासाठी कठीण असतील. काळजी घ्या. कोणाशीही बोलताना मात्र संवाद जपून करा. कोजागरी पौर्णिमा चांगल्या करमणुकीची राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक स्तरावर निर्माण झालेल्या अडचणीवर मात कराल. स्पर्धात्मक गोष्टींच्या मागे लागू नका.
तूळ : धंद्यात वाढ होईल. नवीन परिचय फायदेशीर ठरतील. कला, क्रीडा, साहित्यात प्रेरणादायक घटना घडतील. अधिकार मिळतील. ५ तारखेला दुपारनंतर ६, ७ हे संपूर्ण दिवस अशा या कालावधीत जपूनच पाऊल टाकावे लागेल. एक ना धड भाराभर चिंध्या असे न करता एकाच गोष्टींवर ठाम राहा. वादविवाद या गोष्टींपासून लांब राहा. जग हे व्यवहारावर चालते. भावनिक होऊन व्यवहार करू नका. व्यवहाराचा भाग इतरांच्या हाती सोपवू नका.
वृश्चिक : कायदा मोडू नका. नोकरीधंद्यात नवी संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज दूर करण्याची संधी शोधा. योजनांचा पाठपुरावा करा. चिडचिड, रागराग करून कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही, तेव्हा सहनशीलता वाढवा. इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला जे योग्य वाटते तेच करायचे हे लक्षात घ्या. पौर्णिमेचा दिवस तेवढा चांगला जाईल. बाकी दिवसात काळजी घ्या. नोकरदार वर्गाला आपलेच म्हणणे खरे करून चालणार नाही.
धनू : राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. ५ तारखेला दुपारनंतर ६ व ७ हे संपूर्ण दिवस अशा या कालावधीत वादविवाद करायला कारण कोणतेही लागणार नाही. त्यामुळे काळजी घ्या. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. व्यावसायिकदृष्टय़ा प्रगती होईल. आगामी काळासाठी केलेली तरतूद फायद्याची ठरेल. फायद्याचे प्रमाण वाढते राहील. आर्थिक बाबतीत खर्च मात्र कमी करण्याचा प्रयत्न करा.
मकर : राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहनशीलता, दूरदृष्टिकोन याचा वापर करा. अहंकारयुक्त भाषा दूर ठेवा. तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता. प्रकृतीला जपा. दिनांक ८, ९ हे दोन दिवस, सर्व काही चांगले असेल. व्यावसायिकदृष्टय़ा मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल. कौटुंबिक जीवन सुखाचे राहील. सप्ताहातील सर्वच दिवस चांगले असतील.
कुंभ : राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे गाजतील. पद मिळेल. लोकांच्या मनात संशय निर्माण होईल. कुटुंबात खर्च, वाद होतील. सप्ताहातील सर्व दिवस चांगले असल्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे सोपे जाईल. नोकरदार वर्गाला कामामध्ये आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींचा सल्ला घेणे योग्य राहील. व्यावसायिकदृष्टय़ा धरसोड वृत्ती ठेवता स्थिर राहा. आर्थिकदृष्टय़ा पैशाचे पाठबळ वाढेल.
मीन : नोकरदार वर्गाला नवीन नोकरीची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत परिस्थिती समाधानाची असेल. कामात चूक टाळा. धंद्यात हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न होईल. तटस्थ राहून प्रश्न सोडवा. समाजसेवेसाठी वेळ द्याल. शेजाऱ्यांशी मात्र जेवढय़ास तेवढे राहा. नातेवाईकांशी संवाद जपून करा. दर सप्ताहात चढ-उतारांचे दिवस जरी असले तरी सध्या या सप्ताहातील दिवस उत्तम असतील.